नाशिक : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या आणि मुंबईपेक्षा पाकव्याप्त काश्मीर बरे, अशी टीका करणाऱ्या चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतला झाशीची राणीची उपमा देणारे भाजपचे प्रवक्ते राम कदम यांच्याविरोधात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी फलकबाजी के ली आहे.

कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविल्यापासून ती वादात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर कं गनाची बाजू घेणाऱ्या भाजपवर फलकांद्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोप के ले आहेत. संपूर्ण देशात करोनासारख्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविणे, त्यापासून जनतेला वाचविणे यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधानांनी पीएम निधी, तर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम निधीत यथाशक्ती आर्थिक साहाय्य करावे असे आवाहन केले होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्याकडून मिळणारा निधी मुख्यमंत्री निधीत न देता पंतप्रधान निधीमध्ये वर्ग के ला.  अशी कृती करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात करोनासंदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न फलकाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. फलकात भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी करण्यात आलेले आंदोलन, कंगनाची पाठराखण करणारे राम कदम यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.