अविश्वास ठराव मंजूर; पोलिसांचा कडक बंदोबस्त

नाशिक : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळेंवरील अविश्वास ठराव सोमवारी १५ विरुद्ध एक मताने मंजूर झाला. अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर बाजार समितीतील राजकारण हाणामारीपर्यंत गेले होते. सहकार उपनिबंधक कार्यालयात चुंभळे आणि विरोधी गटाचे संपत सकाळे गटात वाद झाले होते. या पार्श्वभूमीवर, बाजार समिती आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडली. सभापती चुंभळे हे मतदानास गैरहजर राहिले.

mhada Lottery
छत्रपती संभाजीनगरातील ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांची सोडत जाहीर, अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात
Meeting in Mumbai under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde regarding Sulkood water supply Kolhapur
पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी

भाजीपाला खरेदी-विक्रीत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून नाशिककडे पाहिले जाते. परंतु, काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणास्तव ही समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी अनेक वर्षे बाजार समितीवर सत्ता गाजविली. मध्यंतरी कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसची रक्कम घरी नेण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती. पिंगळे यांच्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले. परंतु, त्यांची सभापतिपदाची कारकीर्द भलत्याच कारणांनी गाजली. कर्मचारी भरती प्रकरणात तीन लाखांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधकाच्या कारवाईनंतर त्यांचे सभापतीपद अडचणीत आले. परंतु, उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी ते राखण्याची धडपड चालविली होती. बाजार समितीवर वर्चस्वासाठी चुंभळे आणि विरोधी गटाची धडपड सुरू होती. समिती संचालकांनी चुंभळेंविरोधात अविश्वास ठरावाचे अस्त्र उगारले. यावरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात चुंभळे यांनी संचालक संपत सकाळे, विश्वास नागरे यांना मारहाण केली होती. या घटनाक्रमामुळे अविश्वास ठरावावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती.

सकाळपासून बाजार समितीच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे कामकाज पार पडले. बाजार समितीत एकूण १८ सदस्य आहेत. त्यात पिंगळे यांना बाजार समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. बाजार समितीचे सभापती चुंभळे हे देखील अनुपस्थित होते. यामुळे अविश्वासाच्या प्रस्तावावर १६ सदस्यांनी मतदान केले. १५ विरुद्ध एक मताने अविश्वास ठराव मंजूर झाला. संदीप पाटील या एकमेव सदस्याने चुंभळेंच्या समर्थनार्थ मतदान केले. चुंभळेंना सभापतिपदावरून पायउतार करण्यात विरोधकांना यश आले. बाजार समितीत राजकारण वेगळ्या वळणावर आले आहे. आधी चुंभळेंनी पालकमंत्री छगन भुजबळांवर आरोप केले होते. त्यांच्यामुळे बाजार समितीचा विकास थांबल्याचे आरोप केले होते. यामुळे चुंभळेंना घरचा रस्ता दाखवण्यासाठी भुजबळांनी रस घेतल्याची चर्चा आहे. त्याची परिणती ठराव मंजूर होण्यात झाल्याची चर्चा बाजार समिती आवारात होत आहे.