09 December 2019

News Flash

शिवयुवा प्रतिष्ठानचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम

देवळालीतील शिवयुवा प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम घेण्यात आला

(संग्रहित छायाचित्र)

मायभूमीच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना कुटुंबीयांसमवेत सण-उत्सव साजरे करता येत नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या जवानांना बहिणीची माया मिळावी,या उद्देशाने देवळालीतील शिवयुवा प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम घेण्यात आला. याअंतर्गत देवळाली छावणी मंडळाच्या वॉर्ड क्रमांक सातमधील शिंगवे बहुला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लष्करी जवानांना आमंत्रित करून विद्यार्थिनींनी राखी बांधली.

या वेळी युनिटचे मनोज शिंदे, भामो भिरण, सत्यप्रकाश, सुरता राम, योगेंदर, अश्विन दळवी, भुरा राम, रेडप्पा आदी जवान उपस्थत होते. मुख्याध्यापक कल्पना साळवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड, बाळासाहेब गुळवे, संजय सोनवणे उपस्थित होते.

हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय असून विद्यार्थ्यांनी भविष्यात देशसेवेचे व्रत हाती घ्यावे, असे मनोगत जवानांनी व्यक्त केले. रत्नमाला बैरागी, संजय सोनवणे, रेखा पाटील, प्रतिभा महाजन आदींसह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहसिंग राठोड यांनी केले.

First Published on August 15, 2019 1:21 am

Web Title: shivayuva pratishthans ek rakhi for jawan abn 97
टॅग Raksha Bandhan
Just Now!
X