श्रीपाल सबनीस यांचा इशारा
महाराष्ट्रापासून विदर्भ व मराठवाडय़ाला वेगळे न करता त्या भागातील अनुशेष भरून काढत विकास साधणे आवश्यक आहे. विकासाकडे दुर्लक्ष झाल्यास त्या भागातील असंतोष वाढणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिला.
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्यावतीने शनिवारी येथे सबनीस यांना निवेदन देण्यात आले. महानुभव पंथाचा ग्रंथ साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीतील पालखीत समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली. त्या संदर्भात सबनीस यांनी महानुभावसह सर्व पंथांचे ग्रंथ दिंडीत असावेत, ही बाब अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसमोर मांडली जाणार असल्याचे सांगितले. मराठवाडा व विदर्भाला वेगळे करण्याच्या सध्या चाललेल्या मागणीबाबत त्यांनी तसे करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. उपरोक्त भागाचे तुकडे करू नये. पश्चिम महाराष्ट्राची भूमिका पक्षपाती राहिली असेही ते म्हणाले.