24 September 2020

News Flash

करोनाला रोखण्यासाठी आजपासून १४ दिवस सिन्नर बंद

समूह संसर्गच्या टप्प्यावर पोहोचण्याआधी ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासकीय बैठक घेण्यात आली.

संग्रहित

नाशिक : शहराप्रमाणेच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही करोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळे उपाय योजण्यात येत आहेत. सिन्नर शहरातही रुग्णसंख्येने ४०० चा टप्पा गाठल्याने करोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहर बुधवारपासून चार ऑगस्टपर्यंत १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या सात हजारांपुढे गेली आहे.  टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर आपआपल्या गावांकडे जाणाऱ्यांची  संख्या वाढली. सिन्नरसारख्या ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या अशा मंडळींमुळे रुग्णसंख्या वाढीस हातभार लागला. शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, मालेगावसह अन्य ठिकाणांहून काही जण गावाकडे परतल्याने संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. समूह संसर्गच्या टप्प्यावर पोहोचण्याआधी ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिन्नर चार ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही बैठक झाली.

बैठकीत पुढील १४ दिवस  शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. शहरातील करोनाशी संबंधित संवेदनशील ठिकाणे रेणुका नगर, गणेश पेठसह अन्य ठिकाणी सोमवारी एकाच दिवशी ६३ रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. सिन्नरकरांना दिलासा देण्यासाठी १४ दिवस शहर बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहर बंद ठेवताना अत्यावश्यक सेवेअंतर्गत किराणासह भाजीपाला, फळे यांची दुकाने सुरू ठेवायची की नाही, यासंदर्भात पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. आरोग्य तसेच पोलीस विभागाकडून प्रतिबंधित क्षेत्रात वर्दळ होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 5:13 am

Web Title: sinnar closed for 14 days from today to stop coronavirus zws 70
Next Stories
1 त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना यंदा प्रवेश नाही
2 जनतेच्या सहकार्याशिवाय करोनावर नियंत्रण मिळविणे अशक्य
3 टाळेबंदीने कापड उद्योगाची वीण उसवली..
Just Now!
X