नाशिक : शहर परिसरात अपघातांची मालिका सुरू असून २४ तासात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सात महिन्यांच्या बालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

क्षितिज वाघ (२८) हा रविवारी दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडत असताना कारची धडक बसली. अपघातात क्षितिजच्या डोक्यास, कमरेस आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे क्षितिजचा जागीच मृत्यू झाला. संशयित वाहनचालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना जुन्या सायखेडा रस्त्यावरील एस. बी. प्लाझा येथे घडली. कन्हैया पाटील यांचा सात महिन्याचा मुलगा देवांश हा दुपारी पलंगावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला. खासगी रुग्णालयात दाखल के ले असता त्याचा मृत्यू झाला.  याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वडाळा शिवारातील खोडेनगर भागात  कृष्णा होम येथे राहणाऱ्या वत्सला देवरे (६८) या घराच्या गच्चीत फे ऱ्या मारत असताना चक्कर आल्यामुळे चवथ्या मजल्यावरून खाली पडल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला सिडकोतील राणा प्रताप चौकात राहणारा जयेश बोरसे चक्कर आल्याने राहत्या घरात पडला. त्याला रुग्णालयात दाखल के ले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. अजून एका घटनेत भरधाव दुचाकीची मालवाहू वाहनाला धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात लॅम रोड परिसरात झाला. सनी ठोकळ (२८) हा दुचाकीने विहितगावकडे जात असताना मालवाहू वाहनाला मागून धडक दिली. तोंड, डोके , छातीला जबर मार बसला. त्यामुळे ठोकळ याचा मृत्यू झाला.  याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.