News Flash

खोदलेले रस्ते दुकानदारांच्या मुळावर

हे काम अजूनही पूर्ण न झाल्याने परिसरातील दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे

धुमाळ पॉइंट ते दहीपूलापर्यंत सुरु असलेल्या कामामुळे खोदण्यात आलेले रस्ते (छाया-यतीश भानू)

माल उतरविण्यास अडथळे; ग्राहकांचीही अडचण

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात सुरू असलेली कामे नाशिककरांसाठी डोके दुखी ठरु लागली आहेत. मुख्य व्यापारी बाजारपेठ परिसरात कित्येक दिवसांपासून रस्ता खोदण्यात आला आहे. हे काम अजूनही पूर्ण न झाल्याने परिसरातील दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी वाहने येण्यास जागाच नाही. ग्राहक असूनही त्यांना दुकानापर्यंत येता येत नाही. त्यातच या कामामुळे घरांनाही धोका निर्माण झाला असल्याची तक्रोर करण्यात येत आहे.

नाशिककरांसाठी कपडे, भांडी, किराणा एकाच ठिकाणी मिळणारी बाजारपेट म्हणजे दहीपूल परिसर. या परिसरात कपडे व्यावसायिक, सौंदर्य प्रसाधने दुकाने, सराफ बाजार यांसह किराणा, मिठाईची दुकाने आहेत. मेनरोडपासून दहीपुलाकडे जाणारा रस्ता उताराचा आहे. पावसाळ्यात उतारावरील पाणी थेट दहीपूल, बोहोरपट्टीमधून सराफ बाजारात तुंबते. यामुळे पावसाळा सुरु झाल्यावर या परिसरातील दुकानदारांना कायमच पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

ही परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतंर्गत या भागात रस्ते बांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे. धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक परिसरात दोन महिन्यापूर्वी रस्ता खोदण्यास सुरूवात झाली. मूळ रस्ता दोन फु ट खाली खोदण्यात आला आहे. हा रस्ता आता चार फु ट खोदण्याचे काम सुरू आहे. सध्या शिथीलीकरणाच्या प्रक्रि येत दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. यामुळे कामाला अडथळे निर्माण होऊन संथपणा आला आहे. दुसरीकडे या खोदकामामुळे परिसरात वाहतूक कोंडीसह दुकानापर्यंत माल पोहचविण्यात अडचणी येत असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रोरी आहेत.सराफ बाजारात पाणी तुंबू नये म्हणून हे खोदकाम सुरू झाले. बाजारपेठेतील दुकाने आता सुरू झाल्याने कामास अडथळा येत आहे. दुकाने दुपारी चापर्यंत सुरू असल्याने कामगारांना काम करता येत नाही. हे काम नियोजनशून्य पध्दतीने होत आहे. मूळ रस्ता चार फु ट खोल जाणार आहे. या खोदकामामुळे परिसरातील वाडय़ांना, घरांना धोका निर्माण झाला आहे. नियोजन आराखडा मागितला तर दिला जात नसल्याचे स्थानिक रहिवासी तसेच विक्रेते अवधूत पिंपळे यांनी सांगितले.

आपले दुकान अशा ठिकाणी आहे की ग्राहक या खोदकामामुळे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पावसामुळे माल खराब होण्याची भीती असून कर्मचाऱ्यांचा खर्च, दुकानाचे भाडे असा एक लाखापेक्षा जास्त खर्च होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यावसायिक प्रकाश पंजाबी यांनी व्यक्त के ली. तर नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे म्हणाले, या कामामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. व्यापाऱ्यांना माल भरता येत नाही. दुकानदारांच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत आहे. सध्या खड्डे असल्यामुळे थोडाजरी पाऊस झाला तरी खडडय़ात पाणी जमा होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:42 am

Web Title: smart city company work become headache for nashik residents zws 70
Next Stories
1 भीती गेली अन हास्य उमटले!
2 शहर बस सेवा सुरू करण्याची महापालिकेची तयारी
3 करोनासह अन्य कारणांनी चार महिन्यांत ९,११२ मृत्यू 
Just Now!
X