News Flash

मालेगावी पोलिओ डोस देण्यासाठी अमेरिकेतून खास पथक

रिसरातून पोलिओ प्रबोधनाबाबत फेरी काढण्यात आली.

मालेगावी पोलिओ डोस देण्यासाठी अमेरिकेतून खास पथक
मालेगाव शहरात पोलिओ जनजागृतीसाठी काढण्यात आलेली फेरी.

मालेगाव येथे पोलिओ डोस नाकारणारी ५०० कुटूंबिय प्रशासनाच्या रडारवर असतांना सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. यासाठी शहर परिसरातील १६ रोटरी क्लब एकत्र आले आहेत. अमेरिकेहुन १४ जणांचे खास पथक पोलिओ डोस देण्यासाठी आले आहे. शनिवारी या पथकाच्या उपस्थितीत शहर परिसरातून पोलिओ प्रबोधनाबाबत फेरी काढण्यात आली.

‘दो बूंद जिंदगी के’ असे कितीही म्हटले तरी आजही काही पारंपरिक रुढी व परंपरा यामुळे मालेगाव येथे पोलिओ डोस बालकाला देण्याची पालकांची मानसिकता नाही. प्रशासकीय पातळीवरून बंधनाऐवजी नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे, पोलिओ मात्राची गरज त्यांना समजावी यासाठी रोटरीने पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या रोटरी अंतर्गत काम करणारे १६ चमू यासाठी एकत्र आले असून अमेरिकेतील १४ जणांचा चमू यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. या संदर्भात शनिवारी सकाळी शहर परिसरातून शालेय विद्यार्थ्यांच्या सोबतीने फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत भुतडा यांनी केले. आभार अनिल सुकेनकर यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:09 am

Web Title: special team for malegaon polio doses
Next Stories
1 नाशिक: पालिकेची पोस्टर हटाओ मोहीम जोरात सुरू
2 घोटी टोल नाक्यावर नायब तहसीलदाराला लुटले
3 पहिल्याच दिवशी अमावस्येचे विघ्न
Just Now!
X