News Flash

क्रीडा प्रशिक्षकांचा गौरव

याप्रसंगी ठिपसे दाम्पत्याने पालकांशी संवाद साधत बुद्धिबळातील विविध अडचणी कश्या सोडविल्या जाऊ शकतात.

क्रीडा प्रशिक्षकांचा गौरव
नाशिक जिल्हा बुध्दिबळ संघटनेकडून इतर खेळांच्या प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, भाग्यश्री ठिपसे, प्रवीण ठिपसे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा आदी.

जिल्हा बुध्दिबळ संघटनेचा सन्मान सोहळा

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ाचे नाव इतर खेळांमध्येही राष्ट्रीय पातळीवर गाजविणाऱ्या प्रशिक्षकांना गौरविण्यात आले.

येथील अथर्व मंगल कार्यालयात आयोजित अतिशय तळमळीने, संपूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी वाहणाऱ्या दिग्गजांच्या सन्मान सोहळ्याला जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, बुध्दिबळपटू भाग्यश्री ठिपसे, अर्जुन पुरस्कारप्राप्त ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानार्थींमध्ये नेमबाजीसाठी मोनाली गोऱ्हे, खो-खो चे मंदार देशमुख, क्रिकेटचे मकरंद ओक, बॅडमिंटनचे मकरंद देव, जिम्नॅस्टिकचे प्रबोधन डोणगावकर, संदीप शिंदे, जलतरणचे राजेंद्र निंबाळते, मल्लखांबचे यशवंत जाधव, वेटलिफ्टिंगचे प्रवीण व्यवहारे, अ‍ॅथलेटिक्सचे राजीव जोशी आणि मूकबधिर संघटनेचे प्रकाश फडके यांचा समावेश होता. जिल्ह्य़ाच्या क्रीडा क्षेत्रात प्रथमच एका संघटनेने आपल्या खेळाव्यतिरिक्त इतर खेळातील समर्पित प्रशिक्षकांच्या कार्याचा सन्मान करत परस्पर सहकार्याने खेळ संस्कृती निकोप करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थित सर्वानीच समाधान व्यक्त केले.

पहिल्या टप्प्यात निवडक खेळांसाठी सन्मान प्रदान करण्यात आल्यावर दुसऱ्या टप्प्यात इतर कार्यधुरीणींचादेखील सन्मान करण्याचा जिल्हा संघटनेचा मानस आहे. बुद्धिबळ दिनानिमित्ताने जिल्हा संघटना ५० खेळाडूंना दत्तक घेत असून शाळाशाळांतून गुणवत्तापूर्ण खेळाडूंना निवडत त्यांना वर्षभर  मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध शाळांना तसेच क्रीडा शिक्षकांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करत या योजनेला सुरूवात होत असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांनी केली. खेळाडूंच्या हितासाठी झगडणाऱ्या या संघटनेच्या दूरदर्शी कार्यक्रमास दाद देत शासनाचे सर्वतोपरी सहकार्य यासाठी राहील, अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केली.

शारीरिक खेळांबरोबरच मानसिक आणि बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी नियमित व्यायामावर भर देत खेळाडूंनी आयुष्यात समतोल साधला पाहिजे, असे मत प्रवीण ठिपसे यांनी मांडले. संघटनेच्या ५० खेळाडूंना दत्तक घेण्याच्या कल्पनेला प्रोत्साहित करत बुद्धिबळ खेळातील गुणवत्तेला संघटनेमार्फत योग्य न्याय मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी ठिपसे दाम्पत्याने पालकांशी संवाद साधत बुद्धिबळातील विविध अडचणी कश्या सोडविल्या जाऊ शकतात, बुद्धिबळाच्या डावपेचांचा अभ्यास कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भूषण ठाकूर, सचिन निरंतर, मंगेश गंभीरे, डॉ. सचिन व्यवहारे, विनायक वाडिले, भूषण पवार, निवेदिका सुनेत्रा मांडगावणे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2018 2:15 am

Web Title: sports coaches pride in nashik
Next Stories
1 संभाजी भिडे यांना न्यायालयात हजर रहावे लागणार
2 वीज दरवाढ उद्योगांना मारक
3 पारंपरिक व्यवस्थेत बदल करणे अवघड
Just Now!
X