दिवाळी आणि त्याला लागून येणाऱ्या सुट्टीचे औचित्य साधत पर्यटन आणि परगावी जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळ जादा बसगाडय़ांचे नियोजन करणार असले तरी या काळात प्रवासासाठी त्यांना जादा आर्थिक भार उचलावा लागणार आहे.

सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांकडून लूट होत असल्याने अनेकांची पावले एसटी बस सेवेकडे वळतात. आजवरचा अनुभव लक्षात घेता नाशिक विभागाने या दिवाळीत नफा नाही झाला तरी चालेल, पण तोटय़ात गाडय़ा जाऊ नयेत यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मार्गावर बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

त्यासाठी २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे यासह अन्य मार्गावर फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या आगारांतून लांब पल्ल्यासाठी १८ तर धुळे, जळगांव, नंदुरबार, नगर सोडून अन्य ठिकाणी १६ जादा बसेस प्रवाशांच्या गर्दीनुसार सोडण्यात येणार आहेत.

तसेच सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर, शिर्डी यासह अन्य काही धार्मिक तसेच पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येतील. नाशिक-धुळे मार्गावर दर अध्र्या तासाने तसेच नाशिक-शिर्डी मार्गावर दर अध्र्या तासाने बसेस धावणार आहेत. याशिवाय प्रत्येक बसस्थानकावरील गर्दी, तिचा कल पाहता जादा वाहतूक करण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना आवडेल तिथे प्रवास या योजनेचाही आनंद घेता येईल. या सुविधा सणोत्सवात मिळणार असल्या तरी भाडेवाढीमुळे हा प्रवास तुलनेत महाग ठरणार आहे.

साध्या व निमआराम गाडय़ांसाठी १० टक्के व वातानुकूलितसाठी २० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ दीपावली काळापुरती मर्यादित आहे. २२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही दरवाढ राहणार असून त्यानंतर प्रवासी वाहतूक नियमित दराने होईल.

  • दिवाळीत नाशिक आगारातून सुटणाऱ्या गाडय़ांचे प्रवासी भाडे (जुने भाडे)
  • मुंबई सर्वसाधारण जलद २१५ (१९५), निमआराम ३०२ (२६७), रातराणी २५४ (२३१)
  • पुणे सर्वसाधारण जलद २५० (२२७), निमआराम ३५६ (३१०), रातराणी २९५ (२६८)
  • औरंगाबाद सर्वसाधारण जलद २३६ (२१४), निमआराम ३३७ (२९२), रातराणी २७९ (२५३)
  • बोरिवली २१५ (१९५), निमआराम ३०७ (२६७), रातराणी २५४ (२३१)
  • अहमदनगर सर्वसाधारण जलद २०२ (१८३), निमआराम २८७ (२४९), रातराणी २३८ (२१६)
  • धुळे सर्वसाधारण जलद १८८ (१७०), निमआराम २६७ (२३२), रातराणी २२१ (२०१)
  • जळगाव सर्वसाधारण जलद २९९ (२७१), निमआराम ४२६ (३७०), रातराणी ३५३ (३२०)
  • चोपडा सर्वसाधारण जलद २७८ (२५२), निमआराम ३९६ (३४४), रातराणी ३२८ (२९८)
  • नंदुरबार सर्वसाधारण जलद १७४ (१५८), निमआराम २४८ (२१५), रातराणी २०५ (१८६)
  • शिर्डी सर्वसाधारण जलद ११८ (१०७), निमआराम १६८ (१४६), रातराणी १३९ (१२७)
  • मनमाड सर्वसाधारण जलद १११ (१०१), निमआराम १५८ (१३८), रातराणी १३१ (११९)
  • त्र्यंबकेश्वर सर्वसाधारण जलद ३५ (३२), निमआराम ५० (४३), रातराणी ४० (३७)
  • सप्तशृंगी गड सर्वसाधारण जलद ९० (८२),
  • निमआराम १२९ (११२), रातराणी १०७ (९७)