10 July 2020

News Flash

स्थायी सभापती निवडणूक स्थगित

स्थायी सभापतीची निवडणूक स्थगित झाल्याची माहिती नगरसचिवांनी महापौरांना पत्राद्वारे दिली.

शिवसेनेचा भाजपला धक्का

नाशिक : महापालिका स्थायी समिती सदस्य निवड ठरावाच्या अंमलबजावणीस शासनाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे प्रशासनाने स्थायी समिती सभापतीपदासाठी तीन मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित केली आहे. भाजपच्या कार्यपद्धतीला शिवसेनेच्या आक्षेपाची दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात आयुक्तांचा अभिप्राय घेऊन अिंतम निर्णय घेतला जाईल, असे ठरविण्यात आले आहे. एकंदरीत या स्थगितीमुळे शिवसेनेने सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे.

स्थायी सभापतीची निवडणूक स्थगित झाल्याची माहिती नगरसचिवांनी महापौरांना पत्राद्वारे दिली. स्थायी समितीचे आठ सदस्य फेब्रुवारीअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी सोमवारी विशेष सभा झाली होती. संख्या बळाच्या आधारे तीन सदस्य नियुक्त करावे, अशी सेनेची मागणी होती. परंतु, भाजपने ती अमान्य करत सेनेच्या दोन सदस्यांची नावे जाहीर केली. तर भाजपने स्वत:चे तीन सदस्य नियुक्त केले. तौलानिक बळानुसार सेनेचे तीन सदस्य स्थायीत नियुक्त व्हायला हवे होते. पोटनिवडणुकीत सेना-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात शासन आणि न्यायालयात दाद मागण्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते.

सेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी स्थायी समिती सदस्य निवडीचा ठराव विखंडित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. दरम्यानच्या काळात विभागीय अधिकाऱ्यांनी तीन मार्च रोजी सकाळी ११ वाजता स्थायी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

शिवसेनेच्या आक्षेपाची दखल घेत या प्रकरणात नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घेईपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

..तर स्थायीत सत्ताधारी-विरोधकांचे समान बलाबल

या प्रकरणात पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर अंतिम निर्णयावर स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व राहील की विरोधकांचे हे स्पष्ट होणार आहे. भाजपचे सदस्य ६६ वरून ६४ झाल्यामुळे त्यांचे तौलानिक संख्याबळ ८.३९ इतके आहे. शिवसेनेचे ३५ सदस्य असल्याने त्यांचे तौलानिक संख्याबळ ४.५९ इतके आहे. त्यानुसार शिवसेनेचे तीन सदस्य नियुक्त होणे आवश्यक होते. परंतु, भाजपने सेनेच्या दोन सदस्यांची निवड केल्याचा विलास शिंदे यांचा आक्षेप आहे. सध्या स्थायीमध्ये भाजपचे नऊ, सेनेचे चार, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. सेनेचा आक्षेप मान्य झाल्यास स्थायीत सत्ताधारी आणि विरोधकांचे समसमान संख्याबळ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:54 am

Web Title: standing speaker election bjp shivsean hit akp 94
Next Stories
1 माथाडी कामगारांच्या संपामुळे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प
2 ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम तक्रारदारास परत
3 पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे
Just Now!
X