News Flash

नियोजनबध्द उपक्रमांमुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय सन्मान

पिंपळगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमदार दिलीप  बनकर यांच्या हस्ते सरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

माझी  वसुंधरा योजनेतील राज्य शासनाचा प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर िंपंपळगाव बसवंतच्या सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्राम विकास अधिकारी लिंगराज जंगम यांचा सत्कार करताना आमदार दिलीप बनकर    (छाया-हेमंत थेटे)

पिंपळगाव बसवंत : भारतीय जातीच्या वृक्षांची लागवड, वनराई बंधारे, प्राणवायू निर्मिती करणाऱ्या वृक्षांचा ओझोन पार्क, उद्याने, परसबाग, अंगणवाडी परिसरात सेंद्रिय भाजीपाला लागवड,  कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी यासह  विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल या विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या माझी  वसुंधरा पुरस्कार २०२१ या अभियानात राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पुरस्काराची घोषणा के ल्यानंतर पिंपळगावचे सरपंच अलका बनकर, ग्राम विकास अधिकारी लिंगराज जंगम यांना ऑनलाइन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

१० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील २७८ ग्रामपंचायतींनी माझी वसुंधरा योजनेत सहभाग नोंदविला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पाच तत्त्वांवर काम करत आपल्या गावात विविध योजना राबविण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासकीय समितीच्या वतीने पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांची दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाहणी के ली होती. तत्पूर्वी माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविल्यानंतर सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आणि सदस्यांनी संपूर्ण माझी वसुंधरा योजना सविस्तरपणे समजून घेतली. ध्येयाने काम करून विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. या यशात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचेही परिश्रम कारणीभूत ठरले.

पिंपळगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमदार दिलीप  बनकर यांच्या हस्ते सरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यावेळी एकच जल्लोष केला.

१० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील  २७८ ग्रामपंचायतींनी माझी वसुंधरा या योजनेत सहभाग घेतला होता. अतिशय नियोजनपूर्वक यशस्वी काम करून पिंपळगाव ग्रामपंचायतीने हा पुरस्कार प्राप्त केला. आमदार दिलीप बनकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी उत्साहात काम केले. त्यामुळेच या योजनेतील उपक्रम यशस्वी झाले. शहर विकासासाठी या योजनेचा मोठा लाभ झाला

– लिंगराज जंगम (ग्रामविकास अधिकारी)

सहा महिन्यापासून  पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचातत्वावर काम करतांना विविध योजना यशस्वीपणे राबविल्या. यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले. त्यामुळेच अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार पिंपळगाव ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून राज्य शासनाचा  प्रतिष्ठेचा पुरस्कार  मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे

-गणेश बनकर (ग्रामपंचायत सदस्य)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:58 am

Web Title: state level pimpalgaon gram panchayat activities ssh 93
Next Stories
1 पर्यावरण दिनानिमित्त विविध संस्था, संघटनांकडून वृक्षारोपण
2 करोना योद्ध्यांच्या रक्षणार्थ सक्रिय पुढाकार  
3 करोना संशयितांच्या शोधासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर
Just Now!
X