News Flash

छोटय़ा भूमिका करणाऱ्या कलाकारांची पावले अन्य व्यवसायांकडे

करोनामुळे लागू झालेल्या र्निबधांमुळे सर्वच क्षेत्रांसमोर अडचणी उभ्या राहिल्या.

नाटय़गृहे सुरू होण्याची प्रतीक्षा

नाशिक : टाळेबंदीची झळ अनेक क्षेत्रांना बसली. त्यास नाटय़-चित्रपट क्षेत्रही अपवाद राहिले नाही. नाटय़-चित्रपट क्षेत्राला अनेक कलाकार देणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ात टाळेबंदीच्या काळात मोठे कलाकार तरले असले तरी लहान कलाकारांना मात्र प्रपंच चालविण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागले. निर्बंध शिथिलीकरणात चित्रीकरणावरील निर्बंध काही प्रमाणात दूर झाले असले तरी नाटय़गृहांवरील निर्बंध कायम असल्याने नाटय़गृहे सुरू करण्याची अपेक्षा सर्वानाच आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात नाटय़ परिषदेच्या वतीने गरजू कलावंतांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

करोनामुळे लागू झालेल्या र्निबधांमुळे सर्वच क्षेत्रांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. नाटय़चित्र, सांस्कृतिक क्षेत्रातील उलाढालही त्यामुळे ठप्प झाली. मुंबई, पुण्यासह इतरत्र सुरू असलेले चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण बंद झाले. नाटय़गृहे बंद असल्याने रंगभूमीवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांच्या हातातील रोजगार गेला. नाशिक शहर परिसरात व्यावसायिक कलावंतांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी बहुतांश हौशी कलावंत या व्यवसायावर अवलंबून आहेत. दीड वर्षांपासून टाळेबंदीमुळे त्यांच्या हातातील काम गेल्याने अनेकांनी वेगवेगळे पर्याय निवडण्यास सुरुवात के ली. काहींनी नाटय़, सिने, चित्रपटसृष्टीतील वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्यास प्राधान्य दिले. काहींनी हे क्षेत्र सोडून अन्य व्यवसायांची वाट धरली. व्यावसायिक कलावंत असलेल्या आनंद ओक आणि शुभांगी यांनी टाळेबंदीच्या काळात खवय्यांची अभिरुची जपण्याला प्राधान्य देत स्वतंत्र व्यवसाय सुरू के ला.

रेडी टु इट, चॉकलेट, मोदक असे वेगवेगळे पदार्थ ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून देताना स्वत :चे खाद्यगृह सुरू के ले. पैशांची निकड नसली तरी स्वत :चे काही हवे या प्रेरणेतून त्यांनी आपला छंद जोपासण्यास प्राधान्य दिले. काही छोटे कलावंत घरपोच भाजीपाला पोहोचविण्याचे काम करत आहेत. काही कलावंतांची प्रपंच चालविण्यासाठी अशी धडपड सुरू असताना काही जणांनी मात्र काम बंद असल्याने हातावर हात ठेवून शांत बसणे सोयीस्कर समजले. नाटय़ परिषद, चित्रपट महामंडळ यांच्याकडे सातत्याने मदतीची मागणी के ली जात आहे. अशा हौशी कलावंतांविरुद्धनाटय़वर्तुळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या हक्काच्या विश्रांतीचा उपयोग कलाकारांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी करावा.

याशिवाय वेगळी वाट निवडण्याची वेळ आली आहे. आर्थिक मदत मिळविण्यापेक्षा रंगभूमी पुन्हा नव्याने सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नाटय़प्रयोग बंद असल्याने नाटय़गृहावर अवलंबून असणारे पडद्यामागील तंत्रज्ञ, साहाय्यक यांची उपासमार होत असल्याने नाटय़गृहेही पुन्हा सुरूकरावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

नाटय़ परिषदेतर्फे  मदतीसाठी आवाहन

नाशिकमधील गरजू रंगकर्मीना करोनाच्या पार्श्वभूमीवर किराणा वाटप करण्यात येत आहे. गरजू कलावंतांनी या संदर्भात १० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२४७५६९, ९८२३०४५७९५ या क्र मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:01 am

Web Title: steps small role actors businesses ssh 93
Next Stories
1 संभाजीराजे भोसले यांनी आंदोलन पुढे ढकलावे
2 नियोजनबध्द उपक्रमांमुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय सन्मान
3 पर्यावरण दिनानिमित्त विविध संस्था, संघटनांकडून वृक्षारोपण
Just Now!
X