जिल्ह्यातील ओझर येथील एका प्रसिद्ध शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.
मृत विद्यार्थी मला वर्गामध्ये सतत टपल्या मारत होता.  त्यामुळे मला याचा राग यायचा. मंगळवारी पीटीचा तास सुरु असताना त्याने मला पुन्हा टपली मारली. त्यामुळे याचा मला राग आल्याने मी दप्तरातून आणलेल्या चाकूने त्याला भोसकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ही घटना शाळेच्या मैदानावर घडली. ही घटना घडल्यानंतर जखमी विद्यार्थ्याला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.