News Flash

प्राणवायूच्या वाहतुकीस प्राधान्य

करोनाविषयक आढावा बैठकीत छगन भुजबळ यांची सूचना

संग्रहित

करोनाविषयक आढावा बैठकीत छगन भुजबळ यांची सूचना

नाशिक : प्राणवायू अर्थात ऑक्सिजनअभावी रुग्णांची परवड होत असल्याचे चित्र शहर परिसरात असले तरी जिल्ह्यात पुरेसा प्राणवायू आहे. प्रत्येक रुग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्याची गरज आहे. प्राणवायू सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच प्राणवायूची वाहतूक आणि पुरवठय़ाचे प्राधान्याने व्यवस्थापन करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी के ली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील करोना उपचारासंबंधी आयोजित आढावा बैठकीत भुजबळ यांनी मार्गदर्शन के ले. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप  घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटा उपलब्ध असूनही नागरिकांपर्यंत त्याची माहिती पोहचत नसल्याबद्दल भुजबळ यांनी खंत व्यक्त के ली. ही माहिती पोहचविण्याची प्रणाली गरजेप्रमाणे निर्माण करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा न के ल्यास लोकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्राणवायूच्या तुटवडय़ाबाबत वारंवार चर्चा होत आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन प्राणवायू लागत असून आपल्याकडे तो ४३ मे. टन इतका उपलब्ध आहे. यातील प्राणवायूचा पुरवठा प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोजनासाठी करण्यात यावा. वैद्यकीय कारणासाठी पुरेसा प्राणवायू उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतरच अन्न औषध प्रशासनाच्या तसेच उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगासाठी त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे.  दैनंदिन प्राणवायू वाहतुकीसाठी टँकरची आवश्यकता असून त्यासाठी तत्काळ आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी प्राणवायूच्या वाहतुकीसाठी दररोज दोन टँकर पुरविण्याची ग्वाही दिल्याचे भुजबळांनी सांगितले. करोनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राणवायू के ंद्राची निर्मिती करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ई—निविदेच्या माध्यमातून तात्काळ काम सुरू करून  कुठल्याही रुग्णाला प्राणवायूची कमतरता सद्य:स्थितीत भासणार नाही, याची दक्षता  घेण्यात येत आहे. प्राणवायूयुक्त खाटा आणि व्हेंटिलेटरची संख्याही लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद के ले.

शहर परिसरातील टाळेबंदी उठविण्यासाठी काही उपाय करण्यात आल्यावर लोकांमध्ये बेफिकीर वृत्ती वाढली. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर पथ्य, मुखपट्टीचा वापर अनिवार्य आहे. शहर पोलीस आणि महापालिके ने या अनुषंगाने चार दिवसात कठोर कारवाई करावी, अशी सूचना भुजबळ यांनी के ली. सध्या जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू झाली असून ती यशस्वी करणे गरजेचे आहे.  करोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा तसेच शहर परिसरात करोना कक्ष कु ठे सुरू करता येईल, रुग्णालयाची व्यवस्था याची माहिती देण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी के ली.

पोलीस आयुक्तालयात आज करोना कक्षाचे उद्घाटन

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून शहरी  आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र करोना उपचार के ंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. १०० खाटाच्या के ंद्राचे उद्घाटन शुक्र वारी सायंकाळी पाच  वाजता करण्यात येणार आहे. पोलीस आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्यासाठी रुग्णवाहिका तसेच उपचारांची सोय या के ंद्रामध्ये  करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी या कक्षाला सोयीसुविधा द्यावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी के ले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:07 am

Web Title: suggestion of chhagan bhujbal in the review meeting over coronavirus zws 70
Next Stories
1 शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू
2 निर्यातबंदी विरोधात आता समाजमाध्यमांवर आंदोलन
3 बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात न झाल्यास खासदारांच्या घरासमोर निदर्शने
Just Now!
X