News Flash

करोना केंद्रातून पळालेल्या संशयितास अटक

रोजगाराच्या निमित्ताने शहरात वास्तव्य असताना काही दिवसांपूर्वी किल्ला पोलिसांनी बलात्काराच्या एका गुन्ह्यात त्याला अटक केली होती.

मालेगाव : करोना उपचार केंद्रातून फरार झालेल्या परप्रांतीय करोनाबाधित संशयित आरोपीस येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी काही तासात पकडण्यात यश मिळवले. संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुन्हा उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. माजिद ऊर्फ माहिद मोहम्मद समशेर (२४) असे संशयिताचे नाव असून तो बिहार राज्यातील रहिवासी आहे.

रोजगाराच्या निमित्ताने शहरात वास्तव्य असताना काही दिवसांपूर्वी किल्ला पोलिसांनी बलात्काराच्या एका गुन्ह्यात त्याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला करोना संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी येथील सहारा रुग्णालयाच्या करोना उपचार केंद्रात त्याला दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याने रुग्णालयातून पलायन केले.

रुग्णालयीन सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पोलीस पथकाकडे त्याचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वार घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महामार्गावर शोध मोहीम सुरु  केली.

पथकाने धुळे येथील टोल नाक्याजवळ सापळा रचला असता एका मालमोटारीतून संशयित माजिद हा धुळ्याकडे जात असल्याचे आढळून आले. पथकाने त्याला ताब्यात घेत त्याला पुन्हा उपचार केंद्रात दाखल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:54 am

Web Title: suspect arrested for fleeing corona center akp 94
Next Stories
1 लसीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा जिल्ह्यास फटका
2 ‘एचआयव्ही’सह जीवन जगणाऱ्यांना महिंद्रासह यश फाऊंडेशनतर्फे अन्नधान्याची मदत
3 नाशिकमध्ये बुधवारपासून कडक लॉकडाउन; महापालिका प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
Just Now!
X