गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : शहरातील रसिका आणि आसिफ यांच्या आंतरधर्मीय विवाहासंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुवर्णकार समाजाविषयी आक्षेपार्ह विधान के ल्याचा दावा करीत सर्वशाखीय सुवर्णकार समाजाने मंगळवारी येथील सराफ बाजारात कडू यांच्याविरुध्द गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी आणि राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन के ले. कडू यांच्या

विधानाने व्यथित झाल्यामुळे महाराष्ट्र लाड सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त सुनील माळवे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा करीत कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

येथील प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि आसिफ खान यांचा विवाह नोंदणी पध्दतीने झाला आहे. आडगांवकर यांच्या इच्छेनुसार १७ जुलै रोजी तो हिंदू धर्म पध्दतीने करण्यात येणार होता, परंतु समाजमाध्यमातून या विवाहाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आला. हा विवाह सोहळा थांबविण्यासाठी आडगांवकर यांना धमक्या देण्यात आल्या. रसिका अपंग असल्याने तिच्याशी कोणी लग्नास तयार झाले नसल्याचे आडगांवकर यांनी म्हटले होते.

राज्यमंत्री कडू यांनी या पार्श्वभूमीवर अलीकडेच आडगांवकर कु टुंबीयांची भेट घेत विवाहास पाठिंबा दर्शविला. यावेळी माध्यमांशी बोलताना कडू यांनी सुवर्णकार समाजाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान के ल्याचा समाजाचा दावा आहे.

आडगांवकर यांना सुवर्णकार समाजाने रसिका हिच्यासाठी स्थळे दाखविली. मात्र आडगांवकर यांनीच स्थळे नाकारल्याचा खुलासा सुवर्णकार समाजाने के ला आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, बेजबाबदार विधान करणाऱ्या कडू यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी अखिल सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली.