News Flash

सिन्नरचा बंद पडलेला स्वस्तिक एअर प्रकल्प सुरू

सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर प्लांट २०१९ पासून वीज देयक न भरल्याने बंद अवस्थेत होती.

प्राणवायू निर्मिती होणार

पिंपळगाव बसवंत : सिन्नर येथील मे. स्वस्तिक एअर प्लांट हा वीज देयक न भरल्याने बंद असलेला प्रकल्प निफाडचे आमदार दिलीप  बनकर यांनी के लेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झाला आहे. या प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती सुरु होणार असल्याने जिल्ह्य़ातील प्राणवायू तुटवडय़ावर हा प्रकल्प काही प्रमाणात का होईना हातभार लावणार आहे.

सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर प्लांट २०१९ पासून वीज देयक न भरल्याने बंद अवस्थेत होती. हे आमदार बनकर यांना समजताच त्यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे याविषयी चर्चा के ली. दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाला त्वरीत वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. बनकर हे मुंबईहून नाशिक येथे पोहोचत नाही, तोपर्यंत सदर कंपनीतील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचा राज्यमंत्री तनपुरे यांचा दूरध्वनी आला. बुधवारी सिन्नर येथे तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वस्तिक एयरचे काम पुन्हा सुरू झाले.

मे. स्वस्तिक एयर प्रकल्प दररोज ६०० टाक्यांमध्ये प्राणवायू भरू शकतो. यामुळे जिल्ह्यतील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास हातभार लागेल, असा विश्वास तनपुरेआणि आमदार बनकर यांनी व्यक्त केला. केवळ वीज पुरवठा खंडित असल्याने जर प्राणवायूची निर्मिती बंद असेल आणि करोना रुग्णांचा त्यामुळे मृत्यू हत्त असेल तर तूर्तास वीज देयक वसुलीबाबत अन्य बाबींचा अवलंब करता येऊ शकेल. परंतु, लोकांचा जीव वाचला पाहिजे हे महत्वाचे असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत होणे हे महत्वाचे असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:18 am

Web Title: swastik air plant electricity bills niphad mla dilip bankar ssh 93
Next Stories
1 गुंड रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी
2 करोना संकटात उत्तर महाराष्ट्र वाऱ्यावर
3 जिल्ह्याच्या काही भागात वादळासह गारपीट
Just Now!
X