23 October 2020

News Flash

करोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा

पालकमंत्री छगन भुजबळ यांची सूचना

संग्रहित

पालकमंत्री छगन भुजबळ यांची सूचना

नाशिक : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकात पोलिसांचादेखील समावेश करावा. प्रत्येक घराघरात जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध अथवा माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ‘कोमॉर्बीड’ रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी. सर्वेक्षणाचे काम निरंतरपणे सुरू ठेवावे. खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती दररोज संकलित करावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर येवला शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन के ले.

या वेळी भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड के ंद्रात रूपांतरित करावा. माझे कु टुंब-माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिकांची मदत  घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने करोना चाचणी करावी. यासाठी खासगी डॉक्टरांनाही सूचना द्याव्यात. लोकांमधील करोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. लग्नासह इतर समारंभास नियमभंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. मोठय़ा गावांमध्ये कोविड तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.

बैठकीत शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवल्याच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदी उपस्थित होते.

येवला उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी

पालकमंत्री भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच रुग्णवाढ लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात विभागणी करून कोविड  केअर के ंद्र करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांना दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:12 am

Web Title: take action against those who hide coronavirus information says chhagan bhujbal zws 70
Next Stories
1 त्र्यंबकेश्वर परिसरात रानफुलांना बहर
2 कांदा निर्यातबंदी विरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा
3 धरणसाठा ९४ टक्क्यांवर, १५ धरणे तुडुंब
Just Now!
X