News Flash

खड्डेमय घोटी-भंडारदरा रस्त्याची दुरुस्ती होणार

घोटीजवळील पिंपळगाव मोर या गावापासून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे.

९८ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता

नाशिक : अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यतील इगतपुरी आणि अकोला या आदिवासी तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपळगाव मोर ते भंडारदरा या रस्त्याचे दुखणे अखेर एकदाचे कमी होणार असून रस्त्याची दुरस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.. यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.  रस्त्याच्या कामासाठी  ९८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्यानंतर आता शासनाने पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्ता या साडेतेरा किलोमीटरच्या रस्त्याच्या कामालाही प्रशासकीय मान्यता दिली आहे.

घोटीजवळील पिंपळगाव मोर या गावापासून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. घोटी-भंडारदरा या राज्यमार्गालगत एस.एम.बी.टी. रुग्णालय असून भंडारदरा, रतनगड, कळसुबाई शिखर ही पर्यटन स्थळे आहेत. अहमदनगर जिल्ह्यतील अकोला आणि नाशिक जिल्ह्यतील इगतपुरी हे दोन आदिवासी तालुके या रस्त्यामुळे एकमेकांना जोडले गलेले आहेत. काही वर्षांंपासून घोटी-भंडारदरा या राज्यमार्गाची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरुन वाहने हाकावी लागतात. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

विशेष म्हणजे राज्याच्या विविध भागातून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी पर्यटकांकडून या रस्त्याचा वापर होत असतांनाही त्याच्या दुरुस्तीकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात येत होते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही शेतमालाची वाहतूक करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परिसरातील स्थानिकांसह प्रवासी, वाहनधारक, पर्यटक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सतत तक्रारी करण्यात येत होत्या.

या तक्रोरींची गंभीर दखल घेत खासदार गोडसे यांनी राज्य शासनाकडे  पाठपुरावा सुरु के ला. पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठीच्या खा. गोडसे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या ९८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्ता दरम्यानच्या  कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरण होणार असल्याने आदिवासीबहुल इगतपुरी आणि अकोला या दोन तालुक्यांचा विकास होणे शक्य होईल. यामुळे पर्यटनाला अधिक प्रमाणात चालना मिळणार आहे. पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्त्याच्या मजबुतीकरणात चार नवीन मोऱ्यांचे बांधकाम असणार असून दोन लहान पुलांचा समावेश आहे. या रस्त्याची रुंदी २१ फूट इतकी असणार असून २८ पाईप मोऱ्यांची पुनर्बाधणी तसेच अनेक ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या बळकटीकरणामुळे घोटी परिसरातील एस.एम.बी.टी. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय टळणार असून पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्त्याचे काम राज्य शासनाच्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:43 am

Web Title: the rocky ghoti bhandardara road will be repaired ssh 93
Next Stories
1 जिल्ह्य़ातील धोकादायक शालेय इमारतींच्या दुरुस्तीची गरज
2 मनसेकडून निवडणुकीची तयारी
3 आयारामांना दूर ठेवण्याची भाजपची रणनीती
Just Now!
X