01 October 2020

News Flash

पंचवटीत लूटमारीचे सत्र ; दोन गुन्हेगारांना अटक

साधारणत: तीन ते चार तासांत निमाणी बस स्थानक परिसरात या संशयितांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.

 

गुरुवारी मध्यरात्री पंचवटी परिसरात वाहनधारकाची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना काही तासांतच अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत एकाला जखमी करून संशयित फरार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील किशोर रूपचंद पाटील व त्यांचा मुलगा गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका आप्तेष्टाला रुग्णालयात भेटून घराकडे परतत होते. काटय़ा मारुती परिसरात लाल रंगाच्या पल्सरवरील दोघा संशयितांनी त्यांना आवाज दिला. यामुळे पाटील थांबले असता संशयितांनी त्यांच्याकडील २५०० रुपयांची रोकड व खिशातील भ्रमणध्वनी असा एकूण आठ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. अचानक घडलेल्या घटनेमुळे भेदरलेल्या पाटील यांनी समयसूचकता दाखवत पल्सरचा क्रमांक नोंदवून घेतला आणि पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लगेचच नाकाबंदी केली. साधारणत: तीन ते चार तासांत निमाणी बस स्थानक परिसरात या संशयितांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. पल्सरसह मुकेश मोरे (२०) आणि पंकज आघाव यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अशीच घटना मखमलाबाद रस्त्यावर घडली. सायकलवरून घरी परतत असताना गणेश झिरवाळ यांना पाटानजीक दुचाकीवर आलेल्या तिघांनी अडवले. तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. पैसे नाही असे सांगितल्यावर झाडाझडती घेत त्यांच्या पोटावर वार करून संशयितांनी पलायन केले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य काहींनी पंचवटी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमी झिरवाळ यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:43 am

Web Title: theft in panchavati two criminal arrested
टॅग Arrested,Criminal,Theft
Next Stories
1 नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळचा उत्साह
2 अंकुर चित्रपट महोत्सवात विविध विषयांवर प्रकाशझोत
3 नाशिक जिल्ह्य़ासाठी ११ कोटी ११ लाखांचे अनुदान प्राप्त
Just Now!
X