News Flash

गोदावरीतील प्राचीन कुंडांना धक्का

क्रॉंक्रिटीकरणाच्या कामाचा फटका, कुंड मूळ स्वरुपात पुनर्जिवीत करण्याची मागणी

क्रॉंक्रिटीकरणाच्या कामाचा फटका, कुंड मूळ स्वरुपात पुनर्जिवीत करण्याची मागणी

नाशिक : गोदावरी काँक्रिटीकरणमुक्त करतांना त्याखालील प्राचीन कुंडांचे दगड निखळून पडत असून या कुंडांमध्ये जिवंत जलस्त्रोत असण्याची शक्यता आहे. प्राचीन कुंडांचे महत्व पाहता त्यांच्या रचनेत कुठलाही बदल करू नये. या कुंडांचे खोलीकरण अथवा विस्तारीकरण करू नये. प्राचीन कुंड मूळ स्वरुपात पुनर्जिवीत व्हावेत, यासाठी गॅझेटियर आणि डीएलएलआर नकाशाचा वापर करावा, अशी मागणी या कामाचा पाठपुरावा करणारे याचिकाकर्ते देवांग जानी यांनी केली आहे. पात्रातील तळाचे सिमेंट, काँक्रिट काढतांना कुंडातील स्त्रोतांना इजा होणार नाही, यासाठी विशिष्ट उपकरणाचा वापर करता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

शहरातून वाहणारे गोदापात्र काँक्रिटमध्ये लुप्त झाले आहे. बऱ्याच भवती न भवतीनंतर स्मार्ट सिटी कंपनीने प्रकल्प गोदा अंतर्गत गोदावरी नदीतील काँक्रिटीकरण काढण्याचे काम हाती घेतले. भर पावसाळ्यात हाती घेण्यात आलेल्या कामात जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने काँक्रिट फोडले जात आहे.

पहिल्या टप्प्यात दुतोंडय़ा मारुती ते गाडगे महाराज पुलापर्यंत हे काम करण्यात येत आहे. या पात्रात १७ प्राचीन कुंड आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार याचिकाकर्ते म्हणून महापालिकेला सविस्तर कुंडांची माहिती नाशिक गॅझेटियर आणि डीएलआर नकाशातून दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात पाच प्राचीन कुंड आहेत.

यामध्ये अनामिक, दशाश्वमेध, रामगया, पेशवे आणि खंडोबा कुंडाचा समावेश आहे. पात्रात पाणी असतांना काँक्रिट यंत्राच्या सहाय्याने काढले जाते. तळाच्या कामात दगड निखळून कुंडाला इजा होत असल्याची तक्रार जानी यांनी केली आहे. या अवाढव्य यंत्राऐवजी दुसरी यंत्रणा अधिक उपयोगी ठरू शकते. जेणेकरून इजा न होता कुंडातील स्त्रोत पुनर्जिवीत करता येतील. या कुंडांचे खोलीकरण, विस्तारीकरणाचे प्रयोजन असल्याचा आक्षेप जानी यांनी नोंदविला. त्यासाठी कुंड परिसरात पांढरे पट्टे मारले गेले. प्राचीन कुंडांचे धार्मिकदृष्टय़ा वेगळे महत्व आहे. त्यामुळे कुंडातील मूळ ढाच्यात कुठलाही बदल करू नये. कुंडाचे खोलीकरण करता कामा नये. तीन वर्षांपूर्वी महापालिकेला सादरीकरण करतांना १७ प्राचीन कुंड मूळ स्वरुपात पुनर्जिवीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. विकास कामात नदी पात्राचे आधीच बरेच नुकसान झाले. त्यामुळे नाशिककरांच्या भावनेचा आदर करण्याची मागणी होत आहे.

गोदावरी पात्रातील तळाचे काँक्रिट काढतांना जिवंत जलस्त्रोतांना इजा होऊ नये म्हणून पोकलॅनेऐवजी हाताने चालणाऱ्या यंत्राचा वापर करावा. प्राचीन कुंडांच्या मूळ रचनेत आणि ढाच्यात बदल करून कुंडांचा आकार बदलू नये. सरकारी दस्तावेजानुसार प्राचीन कुंड मूळ स्वरुपात पुनर्जिवीत करावेत. मागील विकास कामात उद्ध्वस्त झालेला सांडवा पुनस्र्थापित करावा.

– देवांग जानी (याचिकाकर्ते)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:15 am

Web Title: threat to godavari ancient kunda while making it free from concretization zws 70
Next Stories
1 हवालदिल कलावंतांना नाटय़ परिषद शाखेचा मदतीचा हात
2 इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रारंभ
3 आॉनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण 
Just Now!
X