News Flash

महिलांची छेड काढणाऱ्या तिघांना अटक

संशयितांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

रात्रीच्या वेळी एकटय़ा महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांविरोधात शहर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांना रात्री सुरक्षित, निर्भीडपणे एकटय़ाने फिरता यावे, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पथकातील महिला पोलीस साध्या वेशात रात्रीच्या वेळी घरी जाण्यास उशीर झाल्याचा बहाणा करून रिक्षा, बसची वाट पाहत उभ्या राहतात.  पथकातील पुरुष कर्मचारी हे महिला पोलिसांच्या आसपास कोणाच्या लक्षात येणार नाही, असे थांबतात. महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन कोणी त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास आसपास थांबलेले पथकातील पोलीस या घटनेचे भ्रमणध्वनीत चित्रण करतात. तसेच संशयिताला अटक केली जाते. रामकुंड, पंचवटी कारंजा, सीबीएस स्थानकालगत या कारवाईत आधीच काही टवाळखोरांना अटक करण्यात आली आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविली गेली. रात्रीच्या वेळी महिलांना एकटी पाहून छेडछाड करणाऱ्या तीन

संशयितांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. शहरात पुढील काळातही मोहीम राबवून टवाळखोरांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:31 am

Web Title: three arrested for abducting women akp 94
Next Stories
1 ‘दूध बँक’बाबत महापालिका अनभिज्ञ
2 नवीन वर्षांत सौर ऊर्जेचा प्रकाश
3 ढगाळ वातावरण निवळल्याने सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद
Just Now!
X