02 March 2021

News Flash

गॅस गळतीमुळे स्फोटात तीन जण जखमी

घरासह चारचाकी वाहनांचे नुकसान

खुटवडनगर येथे गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात घराचे झालेले नुकसान.

घरासह चारचाकी वाहनांचे नुकसान

नाशिक : शहरातील खुटवडनगर भागातील धनदाई कॉलनी परिसर सोमवारी सकाळी एका बंगल्यात वायुगळतीमुळे झालेल्या स्फोटाने हादरला. या दुर्घटनेत दोन वर्षांच्या लहानग्यासह तीन जण जखमी झाले. त्यात पती, पत्नी गंभीररीत्या भाजले. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, भिंतींना तडे गेले. लोखंडी ग्रिल आणि दरवाजा २० ते ३० फूट अंतरावर फेकले गेले. आसपासच्या घरांसह चारचाकी मोटारींच्या काचा फुटल्या.

धनदाई कॉलनीतील बळीराम पगार यांच्या देवकी बंगल्यात ही दुर्घटना घडली. सकाळी नेहमीप्रमाणे पुष्पा पगार या गॅस सुरू करण्यासाठी गेल्या. लायटरची ठिणगी पडताच घरात स्फोट होऊन भडका उडाला. त्यामध्ये पुष्पा पगार यांच्यासह त्यांचे पती बळीराम पगार (५६), आणि नातू रूहान (दोन वर्षे) हे जखमी झाले. स्फोटाची तीव्रता मोठी होती. घराचे लोखंडी ग्रिल, लोखंडी दरवाजा पालापाचोळ्यासारखा उडून कित्येक फुटांवर जाऊन पडला. शौचालय, न्हाणीघराच्या भिंती कोसळल्या. समोरील भागातील भिंतीलाही तडे गेले. बंगल्याच्या वाहनतळातील मोटारींसह आसपासच्या घरांच्या काचा तडकल्या.

या घटनेची माहिती समजल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, साहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुष्पा पगार आणि बळीराम पगार हे या दुर्घटनेत ५० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पगार यांचा मुलगा अतुलचे ९ जानेवारीला लग्न असल्याने त्यांची बहीण घरात मुक्कामाला आली होती. तिच्या बाळाला या घटनेत इजा झाली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

खोलीत साठलेला गॅस कारणीभूत

रात्री किं वा पहाटेच्या सुमारास स्वयंपाकघरात सिलिंडरमधून गॅसगळती झाली. हा गॅस काही खोल्यांमध्ये भरून राहिला. सकाळी लायटरने गॅसची शेगडी सुरू के ल्यानंतर भरून राहिलेल्या गॅसचा स्फोट झाला. स्वयंपाकघरातील सिलिंडर सुस्थितीत होते. गळतीमुळे बहुधा ते रिकामे झाले असण्याची शक्यता आहे. रात्रभर घरात गॅसगळती होत असताना त्याचा वास कोणाला कसा आला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. घराच्या खिडक्या उघडय़ा राहिल्या असत्या तरी गळती झालेला गॅस वातावरणात मिसळला गेला असता. घरात पसरलेल्या वासामुळे शेगडी पेटविली गेली नसती, परंतु तसे काही झाले नाही आणि ही दुर्घटना घडली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:02 am

Web Title: three injured in blast after gas leakage zws 70
Next Stories
1 जमिनीच्या वादातून मुलाचा खून
2 देवाच्या कृपेने मध्य प्रदेशात करोना नियंत्रणात -शिवराजसिंह चौहान
3 नववर्षांत नाशिक-बेळगाव विमानसेवा
Just Now!
X