25 February 2021

News Flash

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत  तीन लाख भाविक

श्रावणातील तिसऱ्या सोमवारला भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे.

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी प्रयाग तीर्थापासून निघालेले भाविक

रक्षाबंधनामुळे भाविकांच्या संख्येत घट

बम बम भोलेच्या जयघोषात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शहर परिसरातील सर्व शिवमंदिरे गर्दीने फुलली. रविवारी रक्षाबंधन असल्याने त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी होणाऱ्या गर्दीवर काहीसा परिणाम झाला.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारला भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्र्यंबक येथे साधारणत: तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. प्रशासनासह मंदिर व्यवस्थापनाने व्यवस्थित नियोजन केले असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्रीत्र्यंबकेश्वरावर अभिषेक करण्यात आला.

यानंतर सुरू झालेली दर्शनासाठी गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. दुपारी पुरोहित संघाच्या वतीने सर्व विश्वस्तांना एकत्र घेत लघुरुद्र पूजन करण्यात आले. सायंकाळी शहर परिसरातून त्र्यंबक राजाची पालखी काढण्यात आली. पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता. रविवारी सायंकाळपासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला भाविकांनी सुरुवात केली. रविवारी रक्षाबंधन असल्याने काही भाविकांनी सोमवारी प्रदक्षिणा केली.

त्र्यंबक ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त औषधसाठय़ाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रदशिणा मार्गावर तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीकडून होणारा कचरा जमा करण्यासाठी मंगळवारी नगरपालिका प्रशासनासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामाजिक संस्था, परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

नाशिक शहर परिसरातील श्रीकपालेश्वर, सोमेश्वर, नीळकंठ शिवमंदिरासह अन्य शिवमंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर व्यवस्थापनाकडून ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

९ रुग्णवाहिका, २७५ बसगाडय़ांची व्यवस्था

भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाटा बस स्थानक, सापगाव फाटा आणि कुशावर्त या ठिकाणी फिरते आरोग्य पथक तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह इतर नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती.  नाशिकहून प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने २७५ जागा बसगाडय़ांचे नियोजन केले होते. यासाठी ईदगाह मैदानाजवळून त्र्यंबकसाठी बस सोडण्यात आल्या. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरात खासगी वाहनांना बंदी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 2:18 am

Web Title: three lakh devotees in the brahmagiri convoy
Next Stories
1 बालनिरीक्षणगृहात ‘हे बंद रेशमाचे’
2 मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावामुळे नाशिककरांमध्ये नाराजी
3 नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव
Just Now!
X