नाशिक : शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे पोलीस कर्मचारीच लाचखोरीत गुंतल्याचे उघड झाले असून तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रोरदारास अटक न करण्यासाठी आणि गन्ह्य़ात मदत करण्याकरिता सोनवणे आणि शहर पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेला पोलीस नाईक सारंग वाघ यांनी २५ हजार रूपयांची मागणी के ली. संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून यासंदर्भात तक्रोर दिली. तक्रोरीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधकने सापळा रचला. पंच आणि साक्षीदारांसमक्ष सोनवणे आणि वाघ यांनी तक्रोरदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १३ हजार रुपये त्वरित आणि उर्वरित १२ हजार रुपये उद्या देण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी सातपूर येथील बोलकर पोलीस चौकी येथे पंच आणि साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी करून सातपूर पोलीस ठाण्यातील शिपाई राहुल गायकवाड याच्या हस्ते १३ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना गायकवाडसह सोनवणे आणि वाघ यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.