15 November 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला दोन संशयितांनी महाविद्यालयामधून मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला

(सांकेतिक छायाचित्र)

अल्पवयीन मुलीला दोन संशयितांनी महाविद्यालयामधून मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी संशयित मारुती घोरपडे (३०, रा. नाशिकरोड) हा त्याच्या मित्रासोबत परिसरातील महाविद्यालयात गेला. त्या ठिकाणी शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे निमित्त सांगत ते तिघे सिन्नर फाटा येथील डोंगरावर गेले. डोंगरावर काही काळ फिरल्यानंतर दोघांनी मुलीसोबत काही छायाचित्रे भ्रमणध्वनीत काढली. घरी परतण्याआधी दोघांनी तिला मित्राच्या खोलीवर नेऊन धमकी देत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.

First Published on September 11, 2019 1:40 am

Web Title: torture on a minor girl akp 94