News Flash

गणेशोत्सवासाठी वाहतुकीवर विविध र्निबध

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीचे र्निबध लागू करण्यात येत आहेत.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीचे र्निबध लागू करण्यात येत आहेत. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने होणार आहे. तसेच अशोक स्तंभ ते रविवार कारंजादरम्यानचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाचव्या व सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने एसटी बसेससह जड वाहतुकीवर र्निबध लागू करण्यात येणार आहेत.

शहरात शेकडो गणेश मंडळांकडून गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गणपतीची आरास पाहण्यासाठी गणेशभक्त दरवर्षी गर्दी करतात. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार निमाणी बसस्थानकाहून शालिमारमार्गे नाशिक रोडकडे जाणाऱ्या एसटी बसेस व इतर सर्व प्रकारची वाहतूक ही रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नलपर्यंत आल्यानंतर सांगली बँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात उपरोक्त भागातून येणारी वाहतूक निमाणी बसस्थानक, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नलवरून मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे नाशिक रोडकडे मार्गस्थ होईल. उपरोक्त काळात नाशिक रोडकडून येणाऱ्या वाहतुकीला शालिमारमार्गे सीबीएसकडे जाण्यास प्रवेश बंद राहील. नाशिक रोडकडून सारडा सर्कलपर्यंत आल्यानंतर वाहने गडकरी चौक, मोडक सिग्नल, सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ, रविवार कारंजामार्गे पंचवटीत मार्गस्थ होतील. अशोक स्तंभ ते रविवार कारंजादरम्यानचा मार्ग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंने वाहने उभी करू नयेत, असे सूचित करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त संपूर्ण गणेशोत्सवात शहरातील किटकॅट चौफुली ते कालिदास कला मंदिरमार्गे शालिमार चौकाकडे जाणारा मार्गही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडीमार्गे किटकॅट, सुमंगलमार्गे शालिमारकडे जाणारा रस्ताही वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पंचवटी विभागातील सरदार चौक ते काळाराम मंदिपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पंचवटी विभागातील मालवीय चौक ते गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मालवीय चौक असा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

गणेशोत्सवात पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करताना मिरवणूक निघते. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन उपरोक्त काळात निमाणी बसस्थानकाहून पंचवटी, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मार्गावरून जाणारी एसटी बसेस प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्रवेश बंद केलेली वाहने त्या दिवशी पंचवटी कारंजा, काटय़ा मारुती चौक, कन्नमवार पूलमार्गे द्वारका चौकात जातील. सीबीएसकडून पंचवटीकडे येणाऱ्या सर्व बसेस तसेच सर्व प्रकारच्या जड वाहनांना उपरोक्त दिवशी अशोक स्तंभ ते रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 5:04 am

Web Title: traffic restrictions and diversions for ganesh festival in nashik
Next Stories
1 थंडावलेल्या ‘जात पडताळणी’वरून महसूल-समाजकल्याण विभागांत जुंपली
2 व्याधिग्रस्त, अंथरुणाला खिळलेल्यांच्या जीवनात ‘दिलासा’
3 १००९ नाशिकमध्ये शाळाबाह्य मुले
Just Now!
X