News Flash

आॉनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण 

शिक्षकांनी आपआपले शैक्षणिक उपक्रम एकमेकांशी समन्वय साधून देव-घेव करावी, अशी सूचना केली.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : राज्य शासन परवानगी देत नाही तोपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना बोलावू नये, अशी सुचना करतांनाच शिक्षकांनी प्रभावीपणे ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी लवकरच त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षक यांची क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, नवोपक्रमशील शिक्षक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याविषयी शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चर्चा केली.

शिक्षकांनी करोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमितपणे सुरू रहावे यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर क्षीरसागर यांनी  शिक्षकांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी शिक्षकांनी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे, असे आवाहन त्यांनी केले. दराडे यांनी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण द्यावे, सर्व शिक्षकांनी आपआपले शैक्षणिक उपक्रम एकमेकांशी समन्वय साधून देव-घेव करावी, अशी सूचना केली.

मुख्य अधिकारी बनसोड यांनी नागरिकांनी नवीन भ्रमणध्वनी खरेदी करतांना जुने भ्रमणध्वनी, टॅब, लॅपटॉप जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दान करावेत, असे आवाहन केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मदत करावी, असे सांगितले. ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणी लक्षात घेता ‘शिक्षक मित्र-गल्ली मित्र’ या सारख्या संकल्पनांमधून ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर देण्यात यावा, अशी सुचना केली. शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी शिक्षकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत आहे काय याची खात्री करण्यास सांगितले. शाळाबाह्य़ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल करावेत. शैक्षणिक वर्ष संपत असतांना प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या वर्गातील नेमून दिलेले अध्ययन निष्पत्ती पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:08 am

Web Title: training of teachers for online education by zilla parishad zws 70
Next Stories
1 झोपडपट्टय़ांमध्ये करोना शिरकावाने प्रशासनापुढील आव्हानात भर
2 घरमालक भाडेकरू वादात महिलेचा मृत्यू
3 Coronavirus : शहरात करोनाचे १८५ नवीन रुग्ण
Just Now!
X