संचालक पसार; गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील मिरजकर सराफ आणि त्रिशा जेम्स कंपनीने गुंतवणूक करणाऱ्या अनेक ग्राहकांना कोटय़वधींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी ग्राहकानेसरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

मिरजकर सराफ यांनी काही वर्षांपूर्वी गंगापूर रोडवरील संकुलात त्रिशा जेम्स हे दागिन्यांचे नवे दालन सुरू केले होते. वेगवेगळ्या कलाकुसरीच्या दागिन्यांमधील वैविध्यतेमुळे मिरजकर सराफ ग्राहकांच्या पसंतीस पडले. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर मिरजकर सराफ आणि त्रिशा जेम्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीच्या संचालकांनी ग्राहकांना पैसे आणि सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्का व्याज देण्याचे आमिष दाखविले होते.

या प्रकरणी फसवणूक झालेल्या पल्लवी उगावकर (३०, रा. शिंगाडा तलाव) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात महेश मिरजकर, हर्षल नाईक, अनिल चौघुले, महेश आढाव, परिक्षित औरंगाबादकर, मिरजकर अ‍ॅण्ड त्रिशाचे सर्व संचालक, कर्मचारी अशा ११ जणांविरुद्ध तक्रार केली आहे.

सराफ बाजारातील मिरजकर सराफ पेढी तसेच गंगापूर रोड येथील त्रिशा ज्वेलर्स दालनासमोर असलेली दुकानेही बंद झाली आहेत. या जागा भाडय़ाने घेतल्या होत्या, कित्येक महिन्यांपासून त्या जागेचे भाडेही दिले नव्हते. संशयित फरार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनेक ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तक्रारदारांची संख्या वाढू शकते, असे सरकारवाडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत यांनी सांगितले.

अशी फसवणूक झाली

सराफ बाजारात मिरजकर सराफ, जेम्स प्रायव्हेट लिमिटेड आमि गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स प्रा. लि. येथे दागिने खरेदी-विक्रीचे दालन सुरू होते. संशयित संचालकांनी आपल्या ओळखीतल्या ग्राहकांना योजनेत पैसे गुंतविण्यास आणि सोने तारण ठेवण्यास सांगितले. यासाठी एक ते दीड टक्का व्याज देण्याचे प्रलोभन दाखविले. अनेकांनी आपल्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तारण ठेवली. सुरुवातीच्या काळात व्याज नियमित मिळत होते. यासाठी ग्राहकांना पुस्तिकाही दिली गेली होती. त्यामध्ये व्याजाची रीतसर नोंदही केली गेली. परंतु काही महिन्यांपासून जादा परतावा देणे बंद झाले. ज्या ठेवी गुंतवल्या त्याही मिळत नसल्याने ग्राहकांनी मिरजकर आणि अन्य संचालकांकडे विचारणा केली. सातत्याने विचारणा होऊ लागल्यावर मिरजकर आणि त्रिशा जेम्सकडून दुकाने बंद करण्यात आली. १३ एप्रिल २०१५ ते १ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत हा प्रकार सुरू होता.