बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात तृप्ती देसाईंनी आज सकाळी प्रवेश घेतला. थेट गाभा-यात जाऊन तृप्ती देसाईं आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकत्यांनी दर्शन घेतले.
देशभरातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद न करण्याच्या न्यायालयीन निर्णयानंतर या मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेशासाठी सकाळी सहा ते सात वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पण या वेळेनंतर श्रीपूजकांशिवाय कोणालाही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. मंदिराच्या नियमांनुसार तृप्ती देसाई यांनी साडी घालून सकाळी सहा ते सात दरम्यान मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या आवारात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक महिलांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, स्वराज्य संघटनेच्या प्रमुख विनीता गुट्टेंसह अन्य महिलांनी गुरूवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केला.