07 April 2020

News Flash

दारणेत बुडून दोन मुलांचा मृत्यू

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहताना दोघे बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

शहराजवळील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वंजारवाडी येथील ईश्वर भाऊसाहेब शिंदे (१०), समाधान प्रकाश शिंदे (११) हे दोघे जण सकाळी १० वाजता म्हैस धुण्यासाठी दारणा नदीपात्रात गेले होते.

त्यावेळी दोघांनीही नदीत पोहण्याचा आनंद घेण्याचे ठरविले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहताना दोघे बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 1:22 am

Web Title: two children drown in river
टॅग Nashik
Next Stories
1 उत्तर महाराष्ट्रात पारा ४४ अंशापुढे
2 महामार्ग ठप्प
3 नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची जाळपोळ
Just Now!
X