News Flash

द्राक्ष उत्पादकांना दोन कोटीचा गंडा

द्राक्षे काडणीची वेळ आल्यावर निर्यातीसाठी गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले.

 

निर्यातक्षम द्राक्ष खरेदी करून उत्पादकांची सुमारे दोन कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील सुनील गायकवाड (रा. पालखेड बंधारा) आणि परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी उपयुक्त अशी द्राक्षे आपल्या शेतात पिकवली. द्राक्षे काडणीची वेळ आल्यावर निर्यातीसाठी गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले. यादरम्यान त्यांचा परिचय क्राऊन इंटरनॅशनल एक्स्पोर्ट इम्पोर्टच्या संचालिका वर्षां सावलिया (रा. राजकोट) यांच्याशी झाला. वर्षां यांनी गायकवाड यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी दिंडोरी परिसरातील शेतकऱ्यांकडून निर्यातीसाठी लागणारे द्राक्षे खरेदी करायचे असल्याचे सांगितले. गायकवाड यांनी वर्षां यांना सोबत घेऊन पालखेड बंधारा परिसरातील १७ द्राक्ष बागायतदारांची भेट घेतली.

निर्यातक्षम द्राक्षांची खरेदी करून ते निर्यात करण्यात आले. तसेच बी. के. एस्पार्टचे ३९ लाख ९४ हजार ७६० रुपये याप्रमाणे एकूण एक कोटी ९८ लाख ७४ हजार ८६० रुपयांची द्राक्षे खरेदी करून बागायतदारांना व्यवहाराचे पैसेच दिले नाही. याबाबत पैसे मागण्यासाठी विचारणा केली असता वर्षां यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गायकवाड यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 12:35 am

Web Title: two crore waste to grape growers akp 94
Next Stories
1 उच्चांकी कांदा दराचा शेतकऱ्यांना नाममात्रच लाभ!
2 रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीस प्रतिबंध
3 रिक्षाचालकांची मनमानी कायम
Just Now!
X