नाशिक : विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण ३२ लाख ६३ हजार ८० लस प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २९ लाख १३ हजार ६०६ नागरिकांचे लसीकरण झाले असून तीन लाख ४९ हजार ४७४ लसी शिल्लक असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली. लसीकरणात विभागात नाशिक जिल्हा प्रथम क्र मांकावर असून नाशिकमध्ये  १० लाख १३ हजार ५३७ नागरिकांचे लसीकरण झाले.

आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या ६४ हजार १३८ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून ३१ हजार १२६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तसेच पहिल्या फळीत काम करणाऱ्या ८४ हजार ८९१ कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली असून ३२ हजार ७९२ कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील १३ हजार ०५७ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असून दोन हजार ५३८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील सहा लाख ३० हजार ९१ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून एक लाख ५४ हजार ९०४ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण सहा लाख ८५ हजार १४१ जणांचे लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील १७ हजार ४५४ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असून दोन हजार ६७१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३ लाख २५ हजार ७९४ जणांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या १५ हजार ५३६ जणांना पहिली

मात्रा देण्यात आली असून ८ हजार २०२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील दोन लाख ३५५ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून ५५ हजार ८९० नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

जळगांव जिल्ह्यात पाच लाख ८३ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

जळगांव जिल्ह्यात एकूण पाच लाख ८३ हजार ३०८ नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्य सेवक, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसह नागरीकांचा समावेश या मध्ये आहे. जळगांव जिल्ह्याला एकूण पाच लाख ९९ हजार १६० लस प्राप्त झाल्या होत्या.

नंदुरबार जिल्ह्यातही आत्तापर्यंत एकूण तीन लाख पाच हजार ८२६ जणांचे लसीकरण करण्यात आले.  १८ ते ४४ वयोगटातील १३ हजार १९६ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असून एक हजार ७३४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील एक लाख ८३ हजार १५७ जणांना पहिली मात्रा देण्यात आला असून ४१ हजार ५१२ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.