शहरासोबत ग्रामीण भागातही प्रभाव

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Mumbai Municipal Corporation, Issues Notices for Tree Trimming, Prevent Monsoon Accidents, housing societies, bmc sent notice to housing societies,
खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील १५ मतदार संघांमध्ये नोटा (यापैकी कुणीही नाही) या पर्यायाची निवड तब्बल २० हजार ८२३ मतदारांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटना, काही संस्थांनी नोटाचा वापर करू नये, यासाठी आवाहन केले होते. काही शैक्षणिक संस्थांनी पथनाटय़ाद्वारे शहरात ठिकठिकाणी जनजागृतीदेखील केली होती. नोटाऐवजी योग्य उमेदवाराचा पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते, परंतु मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सिन्नर मतदारसंघाच्या निकालास नोटाने कलाटणी दिल्याचे दिसते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात शहरी आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात नोटाचा वापर झाला. काही निवडणुकांमध्ये थोडय़ाफार फरकाने भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते. मतदारांमधील नाराजी नोटाच्या रूपात बाहेर येऊ नये, असा हिंदुत्ववादी संघटनांचा प्रयत्न होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोटाचा वापर न करता योग्य उमेदवारांची निवड करावी, असे आवाहन केले होते. संघ विचारांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित काही शैक्षणिक संस्थांनी निवडणूक काळात नोटाचा वापर करू नये म्हणून पथनाटय़ांद्वारे जनजागृती केली.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनासह अनेक संस्था, संघटना प्रयत्नरत होत्या. त्याकरिता अनेक शाळांनी जनजागृती केली. काही शाळांनी जॉगिंग ट्रॅक, गर्दीच्या ठिकाणी पथनाटय़ करीत मतदानाचे आवाहन केले. यावेळी नोटाचा वापर करू नये, त्याऐवजी योग्य उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन करत फलकही झळकाविण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी बरीच धडपड करूनही मतदानात नोटाचा प्रभाव मात्र कमी झाला नाही. या फरकाइतकीच मते नोटाला मिळाली. ही मते कोणत्याही उमेदवारांच्या पारडय़ात गेली असती तर निकालाचे चित्र बदलले असते, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

‘नोटा’चा प्रभाव

नाशिक पूर्वमध्ये नोटाला सर्वाधिक ३०९०, तर येवल्यात सर्वात कमी १०२७ मते मिळाली. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माणिक कोकाटे यांनी शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना २०७२ मतांनी पराभूत केले. कोकाटेंना निसटता विजय मिळाला. या ठिकाणी नोटाला १७०९ मते मिळाली. निकालावर काही अंशी त्याचा परिणाम झाल्याचे लक्षात येते. ग्रामीणच्या तुलनेत शहरात नोटाला पसंती देणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. नाशिक मध्य मतदारसंघात २४४३, नाशिक पश्चिममध्ये २११८, देवळालीत १२४१, चांदवड ११९६, येवला १०२७, कळवण मतदारसंघात २०४८, दिंडोरीत १५५६, नांदगावमध्ये १२६४, मालेगाव बाह्य़मध्ये १४७८, इगतपुरी मतदारसंघात २०४८ उमेदवारांनी नोटा हा पर्याय निवडला. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघाचा विचार करता सुमारे २१ हजार मते नोटाला मिळाली. सिन्नर वगळता इतर मतदारसंघांत नोटाचा वापर निकालावर परिणाम करणारा ठरला नाही. सिन्नरमध्ये काँग्रेसच्या कोकाटे यांना ९६६४४ मते मिळाली, तर सेनेचे राजाभाऊ वाजे यांना ९४३१७ मते मिळाली. २०७२ मतांच्या फरकाने ही जागा राष्ट्रवादीला मिळाली.