03 June 2020

News Flash

सुरगाणा येथे पाणी टंचाई

सात टँकरद्वारे पाणी पुरवठा

सात टँकरद्वारे पाणी पुरवठा

नाशिक : शहरी तसेच ग्रामीण भागात करोनामुळे स्थलांतर, रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत असतांना मेच्या उत्तरार्धात ग्रामीण भागात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे. विशेषत आदिवासीबहुल सुरगाणा भागात टंचाई तीव्र होत आहे. तालुक्यातील २१ गावांमधून टंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर करोनाच्या नियोजनात अडकलेल्या प्रशासनाने सात टँकरव्दारे पाणी पुरवठा केला आहे.

सुरगाणा तालुक्यातील २१ गावांमधून टंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमाळ, उंबरपाडा, चाफावाडी, बाफळून, जामनेमाळ, खडकमाळ, पळशेत, देवळा, भेनशेत, उंबरणे, पांगारणे, शिवपाडा आणि चिंचपाडा या गावांमध्ये टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती करावी लागत आहे. वन विभागाच्या काही भागात असलेले झरे, पाझर तलाव येथील पाणी नागरिकांना भरावे लागत आहे.

टंचाई लक्षात घेता स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीकडून गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविले. टंचाई विभागाकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठस्तरावर याबाबत माहिती दिली गेली. सद्यस्थितीत पाणी प्रश्न सुटण्यासाठी सात टॅँकर मंजूर करून घेतले आहेत. पाच टॅंकर शासकीय, तर दोन टँकर खासगी आहेत. परंतु, यावेळी जुने आणि तकलादू टँॅकर न पाठवता नवे किंवा सुस्थितीतील टँकर पाठविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मोहन गांगुर्डे यांनी केली आहे. सुरगाणा तालुक्यात दरवर्षी ठराविक गावे आणि पाडय़ांना टंचाईला सामोरे जावे लागते.

टंचाई निर्माण झाली की टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव द्यायचा. मग टँॅकर मंजूर होऊन पाऊस पडेपर्यंत इकडून तिकडून पाणी उपलब्ध करून या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करायचा. अनेक वर्षांंपासून हे असेच सुरू आहे. निवडणुकांत अनेक नवे-जुने निवडून येतात. परंतु, लोकप्रतिनिधिनीने टंचाई कायमची मिटविण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हेवेदावे विसरून अनेक वर्षे सुरू असलेल्या या टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मागणीनुसार पुरवठा

सुरगाणा तालुक्यात करोनाचा एकही संशयित रुग्ण नसला तरीदेखील स्थानिक प्रशासन करोनासोबतच तालुक्यातील टंचाईवरदेखील लक्ष ठेवून आहे. पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त होताच सात टँकर मंजूर करण्यात आले आहेत. हे सर्व टॅँकर निर्जंतूक केले जाणार असून टँकरवर स्थानिक चालक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या दोन—तीन दिवसात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  केला जाणार आहे. यापुढे जसे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल.

– विजय सूर्यवंशी  (तहसीलदार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:33 am

Web Title: water scarcity at surgana maharashtra zws 70
Next Stories
1 शहरात करोना तपासणीसाठी आता फिरते वाहन
2 स्थगिती असतानाही कर्जाचे हप्ते कापले
3 नाशिक : मालेगावात करोनाच्या आलेखाने घेतली पुन्हा उसळी
Just Now!
X