07 June 2020

News Flash

महाराष्ट्राच्या संघात नाशिकचे १५ नौकानयनपटू

चेन्नई येथे ७ ते १२ जून या कालावधीत तामिळनाडू नौकानयन संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाहीर

राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या नाशिक येथील वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंसमवेत प्रशिक्षक अंबादास तांबे व इतर.

चेन्नई येथे ७ ते १२ जून या कालावधीत तामिळनाडू नौकानयन संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या महाराष्ट्र संघात येथील वॉटर्स एज बोट क्लबच्या १५ खेळाडूंची निवड झाली आहे. पुणे येथे अलीकडेच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे नाशिकच्या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये राजेंद्र सोनार, सूर्यभान घोलप, पूजा जाधव, पूजा सानप, जागृती शहारे, सोनाली तांबे, प्रणाली तांबे, शांतनू पाटील, रोशन तांबे, पूनम तांबे, मूरमय सालगावकर, सानिका तांबे, निधी भोसले यांचा समावेश आहे. खेळाडूंना बोट क्लबचे प्रशिक्षक अंबादास तांबे, अविनाश देशमुख, मनीष बोरस्ते, संतोष कडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. क्लबचे संस्थापक माजी महापौर प्रकाश मते यांनी खेळाडूंनी सरावात सातत्य ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन केले. नगरसेवक विक्रांत मते यांनी खेळात सातत्य राखून नाशिक जिल्ह्य़ाच्या दत्तू भोकनळप्रमाणे ऑलिम्पिकपर्यंत झेप घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू अनिल काकड, शशिकांत टर्ले, बापू मानकर, मिलिंद कदम, प्रताप देशमुख, तुषार ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 1:04 am

Web Title: waters edge boat club players selected in maharashtra team
Next Stories
1 गुन्हेगारीविरुद्ध आज नाशिकमध्ये काँग्रेसचा मोर्चा
2 जळगाव महापालिकेतील खडसे समर्थक १३ नगरसेवकांचे राजीनामे
3 प्रकाश साळवे, अविनाश चिटणीस, सुनील परमार यांना नाटय़ परिषदेचे पुरस्कार
Just Now!
X