15 December 2019

News Flash

नाशिकमधून ‘व्हॉट्स अ‍ॅप’ सरस

व्हॉट्स अ‍ॅप’ने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत बाजी मारली.

कालिदास कला मंदिरात रंगलेल्या स्पर्धेत या एकांकिकेने उत्कृष्ट एकांकिकेसह वेयक्तीक तीन पारितोषिकांवर वर्चस्व सिध्द केले.

समाज माध्यमाचा  विधायक वापर कसा केला जाऊ शकतो याची जाणीव करून देणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत  बाजी मारली. सोमवारी महाकवी कालिदास कला मंदिरात रंगलेल्या स्पर्धेत या एकांकिकेने उत्कृष्ट एकांकिकेसह वेयक्तीक तीन पारितोषिकांवर वर्चस्व सिध्द केले. ‘केटीएचएम’ महाविद्यालयाची ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आता मुंबईतील महाअंतीम फेरीत इतर सात विभागांमधून निवडलेल्या सात सवरेत्कृष्ट एकांकिकांशी लढत देणार आहे. नाशिक विभागीय फेरीत व्हॉट्स अ‍ॅप, जाने भी दो यारो, द परफेक्ट ब्लेंड, जेनेक्स, कोलाज् या पाच एकांकिकांमध्ये लढत झाली. अंतीम फेरीसाठी परीक्षक म्हणून पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जोगळेकर, यांसह नाशिकचे अंशू सिंग, मुरलीधर खैरनार यांनी काम पाहिले.

First Published on October 13, 2015 4:50 am

Web Title: whatsapp won in nashik
टॅग Whatsapp
Just Now!
X