दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यातील शाळा सुरु

नाशिक :  राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १० महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी शहरात विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प म्हणजे ३१.७४ टक्के  आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे. लवकरच शहरातही विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रथम नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात करोना नियंत्रणात आल्याचा दावा आरोग्य विभागकडून करण्यात येत असला तरी पालक मात्र अद्याप सावधगिरीच्या भूमिके त आहेत. विशेषत: शहरात पालकांची ही जागरूकता अधिक दिसत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय काही पालकांनी पसंत के ला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास काही पालक उत्सुक असले तरी अद्याप खासगी शालेय वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडणे आणि परत आणणे हे शक्य नसल्याने नाइलाजाने त्यांनी विद्यार्थ्यांना घरीच ठेवले आहे.

नाशिक शहर परिसराचा विचार

के ला तर ३२३ शाळांमधील ७२ हजार ५५८ विद्यार्थ्यांपैकी के वळ २३,०३५ विद्यार्थी वर्गात येत आहेत. महापालिके च्या ९६ शाळांतून १२ हजार ९९९ पैकी पाच हजार ६७६ विद्यार्थी येत आहेत. २२७ खासगी शाळांमधील ५९,५५९ पैकी के वळ १७,३५९ विद्यार्थी शाळेत येत आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे हे प्रमाण शहरात सर्वात कमी म्हणजे ३१.७४ टक्के  आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत शाळा उघडल्या आहेत. ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे हमीपत्र दिले; त्यांनाच शाळेत प्रवेश दिला जात आहे. पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, असे काही नियम सांगितल्याने पालकांकडून मुलांना घरी ठेवण्यास पसंती दिली जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत असल्याचे प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.

ग्रामीण भागात एक हजार ९१ शाळांमधून ७५,९३५ विद्यार्थी शाळेत येत आहेत. देवळा आणि चांदवड येथील दोन जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. खासगीपैकी ३७ शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही शाळा सुरू न होण्यामागे काही शिक्षक करोनाग्रस्त आढळले असून काही शिक्षकांचे करोना चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याचे शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर म्हणाले. काही शाळा खासगी तसेच इतर मंडळाच्या आहेत. आश्रमशाळा तसेच गावात करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी नमूद के ले.