News Flash

जातपंचायतीविरोधात कठोर कायदा करणार – राम शिंदे

विविध कार्यक्रमांनिमित्त येथे आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली.

कायद्याच्या राज्यात समांतर दुसरा कायदा करून जातपंचायतीमार्फत निवाडे देण्याचे चाललेले उद्योग शासन खपवून घेणार नाही. रायगडसह राज्यातील काही भागात जातपंचायतींचा जाच समाजातील गोरगरीब घटकांना सहन करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन जातपंचायतींविरोधात कठोर कायदा करीत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.

विविध कार्यक्रमांनिमित्त येथे आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. जातपंचायतींच्या कारभारामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. या संदर्भात पोलीस कारवाई होत असली तरी अधूनमधून हे प्रकार पुढे येताना दिसतात.

या मुद्दय़ावर शिंदे यांनी जातपंचायतींच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. एकविसाव्या शतकात मार्गक्रमण करताना खरे तर समाजाने जातपंचायतीच्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे आहे. काही जातपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब मान्य आहे. कोणत्याही जातपंचायतीने आपला कायदा वा नियम तयार करून निवाडे देणे कायद्याच्या राज्यात चालणार नाही. जातपंचायतींच्या कारभारावर लगाम घालण्यासाठी शासन नवीन कायदा तयार करीत आहे. त्याचा मुसदा तयार झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक पुरवठा व्यवस्थेतील धान्य गैरव्यवहाराचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये उघड झाला. त्यात पोलिसांनी अटकसत्र राबविले. त्या प्रकरणात कोणाला पाठीशी न घालता कारवाई केली जाईल. नाशिकमध्ये जो घोटाळा उघड झाला, तशी स्थिती राज्यात इतरत्र नसल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:34 am

Web Title: will make a hard law against caste panchayat ram shinde
Next Stories
1 नाशिकमधील थंडी पळाली!
2 नाशिक सायकलिस्टतर्फे उद्या ‘हेरिटेज सायकल राइड’
3 नाशिक जिल्ह्याचा आदिवासी उपयोजना प्रारूप आराखडा मंजूर
Just Now!
X