News Flash

जळगावमध्ये तडीपार माजी नगरसेवकासह तिघांना अटक

गावठी कट्टा, पिस्तूल आणि काडतूसं जप्त

जळगावमध्ये तडीपार माजी नगरसेवकासह तिघांना अटक
जळगाव : तडीपार माजी नगरसेवक संतोष बारसेसह (मध्यभागी) इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तडीपारीचे आदेश असताना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे एका हॉटेलमध्ये कंत्राटदारासोबत बैठक घेणाऱ्या माजी नगरसेवकासह त्याच्या दोन साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान, माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्याकडून गावठी कट्टा, पिस्तूल व ३ जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केले आहेत.

माजी नगरसेवक तथा भाजपा कार्यकर्ते संतोष बारसे यांच्याविरुध्द भुसावळ बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना न्यायालयीन प्रक्रिया वगळता भुसावळ शहरात प्रवेशास बंदी आहे.

बंदी असतांनाही संतोष बारसे, त्यांचे साथिदार गोजऱ्या जाधव आणि जय ठाकूर हे जामनेर रस्त्यावरील हॉटेल प्रिमिअरमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक अंगत नेमाणे, पोलीस कर्मचारी राजेंद्र साळुंखे, बंटी सैंदाणे यांच्या ईआरटी पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानक छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 1:29 pm

Web Title: with ex corporator three arrested at jalgao
Next Stories
1 ‘दत्तक’ नाशिक महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी
2 ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेतही अडथळे
3 हेल्मेट जनजागृतीसाठी थेट ‘गणेशा’चे साकडे
Just Now!
X