06 August 2020

News Flash

घरमालक भाडेकरू वादात महिलेचा मृत्यू

आत्महत्या की हत्या याबाबत संभ्रम, घरमालकासह चार संशयितांना अटक

आत्महत्या की हत्या याबाबत संभ्रम, घरमालकासह चार संशयितांना अटक

नाशिक : शहरातील भारतनगर झोपडपट्टीत घरमालक आणि त्याचे नातेवाईक तसेच भाडेकरू यांच्यात झालेल्या वादात भाडेकरू महिलेचा जळाल्याने मृत्यू झाला.

महिलेने स्वत: जाळून घेतले की तिला जाळण्यात आले, याविषयी संभ्रम आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चार शयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा रोड परिसरातील भारत नगर झोपडपट्टीत आयेशा असिम शेख (१८) ही भाडय़ाच्या घरात राहात होती. मंगळवारी सायंकाळी घरमालक बबू, अश्रम शेख, राणी, अमन हे घरी आले. आयेशाकडे थकीत भाडय़ासाठी तगादा लावला. त्यावरून आयेशा आणि घरमालक यांच्यात वाद झाला. या वादातच आयेशाच्या अंगावर पडलेल्या पेट्रोलने पेट घेतला. या प्रकारात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजलेल्या आयेषाने पोलिसांकडे रागाच्या भरात आपण पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतल्याचा जबाब दिला. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालयात दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या जबाबात घरमालक आणि त्याच्या नातेवाईकांनी जाळल्याचे म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित घरमालक आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:02 am

Web Title: woman dies in landlord tenant dispute zws 70
Next Stories
1 Coronavirus : शहरात करोनाचे १८५ नवीन रुग्ण
2 खासगी रुग्णालयांत ७०७ खाटा रिकाम्या
3 सायंकाळनंतर शुकशुकाट!
Just Now!
X