10 April 2020

News Flash

पेटवून घेतलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

तिला कुटुंबातील अन्य सदस्यांनी घरी येण्याची विनवणी केली.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : सासरी आणि माहेरीही जाण्यास मुलीने नकार दिल्याने नैराश्यातून सोमवारी सायंकाळी पंचवटी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर पेटवून घेतलेल्या हरजिंदर अमरितसिंग संधू (५५, रा. पंचवटी) या जखमी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.

हरजिंदर यांची मुलगी अमनप्रित सिंग हिचा विवाह १८ जानेवारीला रायपूर येथील राजिंदरसिंग पड्डा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने अमनप्रित दोन दिवसांपूर्वी सासरी कोणालाही न सांगता रायपूर येथून नाशिकला निघून आली. नाशिकला आल्यावर ती माहेरी न जाता मैत्रिणीकडे थांबली.

दरम्यान, सासरकडील मंडळींनी रायपूर पोलीस ठाण्यात अमनप्रित बेपत्ता असल्याची तक्रार दिली. संधू कुटुंबीयांना अमनप्रित गंजमाळ येथील मैत्रिणीकडे राहत असल्याची माहिती मिळाली. तिला कुटुंबातील अन्य सदस्यांनी घरी येण्याची विनवणी केली. मात्र तिने माहेरी तसेच सासरी जाण्यास नकार दिला. तसा जबाब पोलीस ठाण्यात अन्य नातेवाईकांसमोर लिहून देत असताना हरजिंदर यांनी बाहेर येत दुचाकीतील पेट्रोलने भरलेली बाटली स्वतच्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले.

हरजिंदर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हरजिंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:14 am

Web Title: woman immolated herself outside a police station dies zws 70
Next Stories
1 संस्था, सोसायटी स्थापून ठेवीदारांची फसवणूक
2 कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी रास्ता रोको
3 शिक्षकाच्या प्रयत्नांमुळे मृत विद्यार्थिनीच्या पालकांना घर
Just Now!
X