07 December 2019

News Flash

त्र्यंबकेश्वर देवस्थानात चोरी करणाऱ्या महिलांना अटक

बक देवस्थान परिसरातच या महिला पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली. विठाबाई उपाधे (४५, रा. संगमनेर), मंगल हातागळे (२८, रा, श्रीरामपूर) आणि अलकाबाई सोनवणे (३८, रा. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी अक्षया शेट्टी (३३, रा. कर्नाटक) या त्र्यंबक येथे दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरातील दर्शन रांग पाहता त्यांनी देणगी दर्शनचा पर्याय स्वीकारला. तिकीट घेत असताना त्यांच्या जवळील बॅगेतून संशयिताने तीन हजार ९१० रुपये रोख रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच अक्षया यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता त्यांना अक्षया यांची बॅग लंपास करताना तीन महिला आढळल्या. त्र्यंबक देवस्थान परिसरातच या महिला पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

First Published on July 24, 2019 4:25 am

Web Title: women arrested for stealing devotees money at trimbakeshwar temple zws 70
Just Now!
X