04 December 2020

News Flash

पोलिसांच्या सूचनेकडे महिलांचे दुर्लक्ष

महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

दागिने खेचून नेण्याचे प्रकार वाढले, एक ग्रॅम सोन्याचे दागिने घालण्याची पोलिसांची सूचना

नाशिक : सोन्याचे दागिने सौंदर्य खुलविण्याचा महत्त्वाचा भाग. अनादी काळापासून महिला वर्गास त्यांचे आकर्षण आहे. या दागिन्यांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आणि मागील काही वर्षांत ते परिधान करावे की नाहीत, अशी धास्ती निर्माण झाली. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांचे दागिने खेचून नेण्याच्या घटना दिवसागणिक वाढत असताना त्या रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही. बहुधा यामुळेच पोलिसांनी सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष योजना आखण्याऐवजी महिलांनाच अजब सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. घराबाहेर पडताना महिलांनी ओढणी किं वा पदराने दागिने झाकून घ्यावेत तसेच शक्यतो एक ग्रॅम सोन्याचे दागिने परिधान करावेत, असे वारंवार सल्ले देऊनही त्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार खुद्द पोलीस करत आहेत.

महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मागील काही वर्षांत लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी या माध्यमातून लंपास केले. काही प्रकरणांत चोरट्यांचा छडा लावण्यात यश आले, परंतु काही प्रकरणांत गुन्ह््यांची उकल होऊ शकली नाही. मोटारसायकलवरून येणारे चोरटे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांना हेरून मंगळसूत्र किं वा गळ्यातील दागिने खेचून नेतात.

अकस्मात घडणाऱ्या या घटनांमध्ये महिलांना काही समजण्याच्या आत चोरटे भरधाव पसार होतात. शहरातील सर्वच भागांत अधूनमधून हे प्रकार घडत असतात. अशा गुन्ह््यांना अटकाव घालण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाकाबंदीची नवीन पद्धत सुरू केली. या संदर्भात सर्व ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अंमलबजावणी केली जात आहे.

त्याअंतर्गत रस्त्यावरील संशयित तपासणीतून सुटणार नाही, याची दक्षता घेतली जाते. सोनसाखळी खेचणाऱ्या किं वा तत्सम गुन्हेगारांना अटकाव घालण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरू शकते. दुसरीकडे पोलिसांनी शहरातील महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना अजब सल्ले दिले आहेत.

घरातील पुरुषांनी प्रबोधन करावे

इंदिरानगर पोलीस ठाण्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात आपल्या ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांत महिलांचे दागिने मोटारसायकलवरून येऊन खेचून नेण्याचे प्रकार घडल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सकाळी किं वा रात्री फिरताना, बाजारात जाताना म्हणजे घरातून बाहेर पडताना ओढणी किं वा पदराने दागिने झाकून घेण्याबाबत तसेच शक्यतो एक ग्रॅम सोन्याचे दागिने घालण्याची सूचना वारंवार पोलिसांनी करूनही महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. घरातील पुरुष मंडळींनी याबाबत महिलांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. महिलांनी सतर्क राहून सूचनांचे पालन करावे, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:11 am

Web Title: women disregard for police instructions akp 94
Next Stories
1 समुद्राकडे वाहणारे पाणी वळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
2 विविध कार्यक्रमांव्दारे बळीराजा गौरव दिन साजरा
3 कुमारी माता, अनाथ बालकांचा प्रश्न गंभीर
Just Now!
X