19 February 2020

News Flash

समन्वयक भावना महाजन यांचे ‘निमा’त मार्गदर्शन

साध्या वेशात पथकातील पोलीस छेडछाड तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सज्ज असतात.

महिलांना योग्यवेळी पोलिसांची मदत मिळावी हा निर्भया पथकाचा उद्देश

महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, निर्भयपणे आयुष्य जगता यावे, त्यांना योग्यवेळी पोलिसांचे सहकार्य मिळावे, हा निर्भया पथकाचा उद्देश आहे, असे निर्भया पथकाच्या समन्वयक भावना महाजन यांनी सांगितले.

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि नाशिक शहर पोलीस यांच्या संयुक्तपणे सातपूर येथील निमा हाऊसमध्ये आयोजित निर्भया जनजागृती कार्यक्रमात महाजन यांनी मार्गदर्शन केले. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध महिला, मुलींनी निर्भया पथकाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही महाजन यांनी  केले.

पथकाचे आठ संघ जिल्ह्यात असून विविध महाविद्यालये, जॉगिंग ट्रॅक तसेच अन्य ठिकाणी साध्या वेशात पथकातील पोलीस छेडछाड तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सज्ज असतात. छुप्या कॅमेऱ्याचाही वापर त्यांच्यातर्फे पाळत ठेवण्यासाठी होत असतो. दहापेक्षा अधिक महिला कर्मचारी आणि कामगार असलेल्याकार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक असून तसे न केल्यास गुन्हा दाखल होऊ  शकतो. बालविवाह, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, बालमजुरी सारखे प्रकार रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिला आणि मुलींनी अडचणी आणि तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक १०९१, ९४०३१६५८३०, ९४०३१६५६७४, ९४०३१६५५०६, ९४०३१६५१९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. निर्भया पथकाची कार्यपद्धत महाजन यांनी सचित्र सादरीकरणाव्दारे मांडली. महाजन यांनी उपस्थित महिला उद्योजिकांच्या अडचणी आणि सुविधा जाणून घेतल्या.

व्यासपीठावर निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, निमा महिला उद्योजिका समितीच्या अध्यक्षा नीलिमा पाटील, सह अध्यक्षा सरिता नारंग यांची उपस्थिती होती. नीलिमा पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यRमाच्या आयोजनामागचा उद्देश सांगितला.

सूत्रसंचालन सरिता नारंग यांनी केले. निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी निमाच्या कार्याची थोडक्यात माहिती देत हा कार्यRम औद्योगिक क्षेत्रात जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. गणेशोत्सवात विविध मित्रमंडळांमध्ये ठराविक वेळ राखीव ठेऊन जनजागृतीपर निर्भया पथकाविषयीच्या चित्रफितीचे प्रसारण केल्यास पथकाचा उद्देश साध्य होईल, अशी सूचना त्यांनी केली.

First Published on September 6, 2019 3:48 am

Web Title: women life help police akp 94
Next Stories
1 आर्थिक वादातून खून
2 संगणकीय प्रशिक्षणात ३०० कैद्यांना स्वारस्य!
3 रविवार कारंजा मित्र मंडळाची सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडी
Just Now!
X