30 September 2020

News Flash

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल, संशयित मोकाट

जिल्हय़ात विनयभंग व बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे घडूनही संशयितांना अद्याप अटक झालेली नाही.

 

प्रतिनिधी, नाशिकमहिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन जलद पद्धतीने त्यावर कारवाई करावी, अशी सूचना दस्तुरखुद्द पोलीस महासंचालकांनी केली असताना आजही महिलांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्हय़ात विनयभंग व बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे घडूनही संशयितांना अद्याप अटक झालेली नाही.

येवला तालुक्यात सोमठाणे येथे मजुरी करणारी पीडित महिला गुरुवारी रात्री काम आटोपून आपल्या झोपडीवजा घरात झोपली होती. रात्री उशिरा त्याच परिसरात राहणाऱ्या पुंडलिक बापू पवारने महिला एकटीच आहे हे पाहून घराच्या मागील बाजूस असलेली कच्च्या विटाची भिंत पाडून आत प्रवेश केला. तिला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने रात्री उशिराने येवला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अद्याप संशयिताला अटक झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विनयभंगाची घटना नाशिक रोड भागात घडली. जेल रोड भागात वास्तव्यास असणारी अल्पवयीन मुलगी क्लासला जात असताना संशयित विनायक अल्हाड व राजेंद्र सोनवणे यांनी तिला अडवले. संशयितांनी तिला प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी करत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने ही घटना आपल्या भावास सांगितली. भावाने संशयितांकडे विचारणा केली असता संबंधितांनी मुलीसह तिच्या भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. संशयितांनी मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:02 am

Web Title: women molestation cases in nashik
Next Stories
1 द्वारका चौकातील सहा मार्ग वाहतुकीसाठी आजपासून बंद
2 लाच स्वीकारणाऱ्या भूसंपादन मंडळ अधिकाऱ्यास सक्तमजुरी
3 ‘चेकमेट’ दरोडा प्रकरण, ठाणे पोलिसांची नाशिकमध्ये शोध मोहीम
Just Now!
X