25 October 2020

News Flash

यशवंत व्यायामशाळेला एक कोटीचा निधी देण्याची आमदारांची ग्वाही

लोकप्रतिनिधी म्हणून अशा संस्थेला सर्वोतोपरी मदत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नाशिक येथील यशवंत व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्ताने विविध उपक्रमांची आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी पाहणी केली. या वेळी प्रा. सुहास फरांदे, अविनाश टिळे, दीपक पाटील, रघुनाथ महाबळ, आबासाहेब घाडगे, आनंद खरे आदी उपस्थित होते.  

शतकापासून व्यायाम आणि विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून शहरातील युवा पिढीला सक्षम करण्याचे काम यशवंत व्यायामशाळा अविरतपणे करत असून अत्यंत अल्प दरात सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे स्तुत्य काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमातून ९० लाखांचा निधी आणि स्वत:च्या आमदार निधीतून १० लाख याप्रमाणे एक कोटीपर्यंतचा निधी व्यायामशाळेला मिळवून देणार, अशी ग्वाही प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

येथील यशवंत व्यायाम शाळेच्या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त आ. देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमास भाजप प्रदेश पदाधिकारी प्रा. सुहास फरांदे, नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, ज्येष्ठ प्रशिक्षक आबासाहेब घाडगे उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. या वेळी आ. फरांदे यांनी यशवंत व्यायामशाळा आणि आपल्यातील नातेही स्पष्ट केले. आपण येथे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी येत होतो, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. लोकप्रतिनिधी म्हणून अशा संस्थेला सर्वोतोपरी मदत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी प्रा. सुहास फरांदे यांनी शतक महोत्सवी वर्षांनिमित्ताने या व्यायामशाळेत सर्व सुविधायुक्त उत्कृष्ट प्रकारचे क्रीडा संकुल उभारणीसाठी प्रयत्न करण्याची हमी दिली. निधी कमी पडत असेल तर वेगळ्या माध्यमातून निधी उभा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी अविनाश टिळे यांनीही मार्गदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:39 am

Web Title: yashwant gym school at nashik
टॅग Nashik
Next Stories
1 विद्यापीठांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास आवश्यक
2 मायलेक हत्येप्रकरणी घरमालकाच्या मुलास अटक
3 अतिक्रमीत झोपडपट्टी दंगल प्रकरणातील फरार नगरसेवकपुत्रासह चौघांना अटक
Just Now!
X