योगाची प्रगती आणि विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने येथील योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड केली आहे. योग विद्या धाम संस्थेमार्फत त्यांनी लाखो लोकांपर्यंत योगा पोहोचविला आहे. विविध गटात प्राप्त झालेल्या १८६ नामांकनातून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. चषक, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांनी या पुरस्कारांची घोषणा केली. आयुष मंत्रालयाने पुरस्कारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. पुरस्कार निवडीसाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या नामांकनांची छाननी करून १८६ नामांकनातून पुरस्कार्थी व्यक्ती, संस्थांची निवड प्रक्रिया पार पडली. २०१८ वर्षांसाठीचा पुरस्कार विश्वास मंडलिक (वैयक्तिक-राष्ट्रीय) आणि योग संस्था, मुंबई (संघटना – राष्ट्रीय) जाहीर करण्यात आला. मंडलिक हे मागील ५५ वर्षांपासून योग प्रचारात योगदान देत आहेत. १९७८ मध्ये त्यांनी योग विद्या धामची पहिली शाखा स्थापन केली. आज या संस्थेची भारतात १६० केंद्र आहेत.  योग विद्याधामच्या माध्यमातून त्यांनी आजवर लाखो लोकांपर्यंत योग पोहचवला. १९८३ मध्ये त्यांनी योग शिक्षण परिषदेसाठी योगा विद्या गुरूकुल संस्थेची स्थापना केली. योगाच्या प्रचारासाठी योग चैतन्य सेवा प्रतिष्ठान नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला. योगा अभ्यासावर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली आहेत. विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मंडलिक यांनी ३०० सीडी विकसित केल्या आहेत.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
prakash mahajan on Raj thackeray
मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देतायत? प्रकाश महाजन म्हणाले, “राज ठाकरेंमुळे आमची…”
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

‘प्रचारासाठी योग शिक्षकांची गरज’

भारताचे योगशास्त्र जगाने मान्य केले आहे. जगभरात त्याचा प्रचार, प्रसार होण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात योग शिक्षक तयार व्हावेत आणि त्या माध्यमातून समाजाचे कल्याण करण्याच्या भूमिकेतून योगाचा प्रसार व्हावा, असे आवाहन योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांनी केले. जागतिक योगदिनानिमित्त योग विद्याधामच्या वतीने माऊली लॉन्स येथे आयोजित योग शिबिरात ते बोलत होते. पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या सदस्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी पुरस्कारातून मिळणारी २५ लाख रुपयांची रक्कम योग प्रसारासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. योगसाधना जगातील प्रत्येक मनुष्याला आवश्यक आणि अनिवार्य आहे. योगसाधना केल्यास सर्व प्रश्न सुटतात. हजारो वर्षांनंतरही योगसाधना चांगलाच परिमाण देणारी आहे. त्यामुळे योग साधनेला, योगाच्या अभ्यासाला मर्यादा नसल्याचे त्यांनी सूचित केले.