31 May 2020

News Flash

‘तेजाब’ चित्रपटातील गाणे व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसला ठेऊन त्याने केली आत्महत्या

आईच्याच साडीने घेतला गळफास

सनी पगारे

नाशिकमधील पंचवटी-म्हसरुळ गावातील एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनी पगारे असे या तरुणाचे नाव असून नैराश्येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळते. आत्महत्या करण्याआधीच त्याने ‘तेजाब’ चित्रपटातील ‘सो गया ये जहा.. सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडिओ शूट करुन तो व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसला ठेवला होता. गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन सनीने आत्महत्या केली.

आई-वडिलांसोबत सनी राहत होता. त्याचे वडील एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पामध्ये कामाला होते. मात्र ते लवकरच निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी सनी कामाला लागणार होता. मात्र केवळ बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्याने सनी या नोकरी संदर्भात साशंक होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो बेचैन होता. त्यामुळेच सनीने गुरुवारी दुपारी ‘तेजाब’ चित्रपटातील ‘सो गया ये जहा.. सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडिओ शूट करुन तो व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसला ठेवले होते. अनेक जवळच्या मित्रांनी त्याला फोन करुन यासंदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचाही फोन उचलला नाही. गुरुवारी रात्री तो दीड वाजता घरी आला. त्याच्या आईनेच घराचा दरवाजा उघडला. ‘मी माडीवर झोपायला जातं आहे,’ असं सांगून तो घरच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. मात्र शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जेव्हा त्याची आई त्याला झोपेतून उठवण्यासाठी वरील खोलीमध्ये गेली तेव्हा तो मृतअवस्थेत अढळून आला. त्याने आपल्या आईच्या साडीनेच गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली असून या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 10:55 am

Web Title: youth commit suicide in nashik scsg 91
Next Stories
1 पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत मारली उडी, ती वाचली पण तो बुडाला
2 लघू उद्योजकांवर आर्थिक संकट
3 अपुऱ्या मनुष्यबळात पंचनामे करताना दमछाक
Just Now!
X